झोपेत बडबडण्याची समस्या हलक्यात घेऊ नका; हे आहेत सोपे उपाय

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 18 February 2021

आपल्याला अथवा आपल्या जवळच्या व्यक्तीला देखील झोपेत बडबडायची समस्या असेल तर आपण ही माहिती जरुर वाचायलाच हवी. 

नवी दिल्ली : काहींना झोपत बडबडायची सवय असते. आपल्या घरात देखील एखाद्याला रात्री झोपतच बडबडताना आपण पाहिलं असेल. याप्रकारे झोपत बोलण्याची समस्या आजकाल फारच सर्वसामान्य झाली आहे. लोक या समस्येला फारच हलक्यात घेतात मात्र, ही समस्या पुढे जाऊन भयानक रुप धारण करु शकते, याची त्यांना कल्पनाही नसते. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, जर या समस्येला दुर्लक्षित केलं गेलं तर ही समस्या स्लीपिंग डिसऑर्डरची समस्या बनू शकते. जर आपल्याला अथवा आपल्या जवळच्या व्यक्तीला अशी काही समस्या असेल तर आपण ही माहिती जरुर वाचायलाच हवी. 

हेही वाचा - अ.. अ.. अननस खूपच फायदेशीर! आरोग्यासाठी कमालीचे लाभदायक फळ

लोक झोपत का बडबडतात?
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, ही समस्या त्या लोकांना असते ज्यांना स्लीपिंग डिसऑर्डर असतो. हे लोक झोपेत स्वत:शीच बोलतात. मात्र ते आपल्या अस्पष्टपणे ऐकू येतं. असं म्हटलं जातं की ही समस्या लहान मुलांना तसेच वयस्कर लोकांना अधिकतर असते. या समस्येला पॅरासोमनिया असंही म्हटलं जातं.

काय आहेत याची लक्षणे?

  • बदलती जीवनशैली
  • चुकीचे खान-पान
  • तणाव
  • कामाचे ओझे
  • शारीरिक थकवा
  • झोपण्याच्या अनिश्चित वेळा

हेही वाचा - तुमची त्वचा जळजळतीय?; 'हे' उपाय करुन पहा, निश्चित आराम मिळेल!

यावर उपाय काय?
झोपत बडबडण्याच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी सर्वांत आधी आपण तणावापासून दूर राहायला हवं. तसेच आपल्या झोपण्याची वेळ देखील नेहमीसाठी निश्चित केली पाहिजे. सुयोग्य खाणेपिणे आणि मन फ्रेश ठेवायला हवे. या समस्येपासून मुक्त होण्यासाठी व्यायामदेखील केला गेला पाहिजे. तसेच आपला मेंदू शांत ठेवण्यावर भर दिला पाहिजे. या सोप्या पण महत्त्वपूर्ण समस्यांनी आपण झोपत बडबडण्याच्या समस्येपासून दूर राहू शकता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sleeping Disorder Talking in Your Sleep parasomnia