चेतना तरंग : संघर्षातसुद्धा समाधानी राहा!

केवळ ज्ञानसंवर्धक बोला. कुणीही दुसऱ्याबद्दल वाईट बोलले, तर त्याचा तुम्ही पुनरुच्चार करू नका आणि तुमच्याबद्दल अमुक व्यक्ती तमुक बोलली असे कुणी तुम्हाला सांगितले, तर ते ऐकून घेऊ नका.
Sri Sri Ravishankar
Sri Sri RavishankarSakal

केवळ ज्ञानसंवर्धक बोला. कुणीही दुसऱ्याबद्दल वाईट बोलले, तर त्याचा तुम्ही पुनरुच्चार करू नका आणि तुमच्याबद्दल अमुक व्यक्ती तमुक बोलली असे कुणी तुम्हाला सांगितले, तर ते ऐकून घेऊ नका. असे कुणी बोलू लागले, तर त्याला ऐकू नका, थांबवा. कुणी तुमच्यावर प्रत्यक्ष आरोप करू लागले, तर त्यांचे म्हणणे ऐकू नका. असे बोलून ते तुमचे वाईट कर्म नष्ट करीत आहेत, हे ध्यानात असू द्या आणि तुम्ही तुमच्या गुरूच्या कृपाछत्राखाली असल्याची तुम्हाला जाणीव असल्यास जगातले सगळे आरोप तुम्ही हसत झेलू शकाल.

तुम्ही दुसऱ्यावर आरोप लावता, तेव्हा तुम्ही त्यांचे वाईट कर्म स्वीकारता. तुम्ही दुसऱ्याचे कौतुक करता, तेव्हा तुम्ही त्यांचे चांगले कर्म मिळवत असता. आपली चांगली वाईट सर्व कर्मे ईश्वरचरणी समर्पित करा – आणि मुक्त व्हा. या जगाचा स्थायीभाव संघर्षाचाच आहे, पण समाधान हा आत्म्याचा स्थायीभाव आहे. म्हणून संघर्षामध्येच राहून समाधान मिळावा. या जगातील संघर्षपूर्ण खेळींमुळे थकवा आल्यावर आत्मीय समाधानात स्थिर व्हा आणि या अतिसमाधानाचा कंटाळा आल्यास पुन्हा जगाच्या संघर्षात घुसा. अर्थात, तुम्ही गुरूच्या निकट सान्निध्यात असल्यास तुम्ही या दोन्ही गोष्टी एकाच वेळी करू शकाल!

Sri Sri Ravishankar
योगा लाईफस्टाईल : कोष : शारीरिक आणि मानसिक आरोग्य

सहसा शांतीप्रिय लोकांना संघर्ष, भांडण नको असते. आणि जे भांडत असतात त्यांना शांती लाभत नाही. संघर्ष करीत असतानाच आत्म्याच्या पातळीवर शांत असण्याची खरे तर आवश्यकता आहे. संघर्ष संपवायचा प्रयत्न केल्यास वाढतच राहातो. म्हणून संघर्ष संपवत न बसता त्याला सामोरे जा आणि अंतर्यामी मात्र शांत राहा. हे वाचल्यावर काही आठवले का? भगवद्गीतेचा हाच तर संपूर्ण संदेश आहे! कृष्ण अर्जुनाला उपदेश करतात, की अंतर्यामी शांती अनुभवतच या जगात संघर्ष, युद्ध कर. युद्ध आणि मनःशांती एकाच समयी. ईश्वर या जगात सर्वकाळ आहे आणि युगानुयुगे इथले सर्व संघर्ष अनुभवत आला आहे. तो या सर्व संघर्षांना सामोरा जाऊ शकतो, तर तुम्हीसुद्धा तुमच्या संघर्षांना सामोरे जाऊ शकता आणि ज्या क्षणी तुम्ही संघर्षांचा सामना करण्यास तयार होता, तेव्हा तो संघर्ष एकदम छोटा होऊन जातो.

या जगात हेच घडत आले आहे : तुम्ही एक संघर्ष संपवू पाहता, तर तोवर दुसरा संघर्ष उत्पन्न होतो. उदाहरणार्थ, रशियातील संघर्ष संपता संपता युरोपमध्ये बोस्नियाची समस्या सुरू झाली. किंवा तुम्ही सर्दी खोकल्यावर औषध घेऊन ठीक होता होता पाठदुखी सुरू होते. आणि त्या दुखण्यातून तुम्ही बाहेर पडाल, सर्व शरीर तंदुरुस्त कराल, तर मनाच्या व्याधी सुरू होतात. या जगात नेहमी असेच काही चालू असते. होय ना?

काहीही हेतू वा कारण नसतानासुद्धा गैरसमज व बेबनाव घडतात आणि झगडा निर्माण होतो. त्या झगड्यांना, समस्यांना पूर्णपणे सोडवणे नेहमी आपल्या हातात नसतेच. पण त्यांच्यासह राहून, त्यांना सामोरे जाऊनही जिवंत आणि शांत राहा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com