esakal | पोटाशी संबंधित तक्रारींमध्ये वाढ; घरी करून बघा हे उपाय
sakal

बोलून बातमी शोधा

पोटाशी संबंधित तक्रारींमध्ये वाढ; घरी करून बघा हे उपाय

पोटाशी संबंधित तक्रारींमध्ये वाढ; घरी करून बघा हे उपाय

sakal_logo
By
नीलेश डाखोरे

नागपूर : बदलत्या जीवनशैलीमुळे खाणे-पिणे, झोप, मानसिक स्वास्थ आणि आरोग्यावर दुष्परिणाम होत आहे. पोटाच्या लहानसहान तक्रारीही भविष्यात गंभीर रूप धारण करू लागल्या आहेत. जंक फुडचे सेवन, खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी, व्यायामाचा अभाव, अपुरी झोप, बैठे काम अशा घातक जीवनशैलीमुळे पोटाशी संबंधित तक्रारींमध्ये वाढच होत असल्याचे दिसून येते. तरुणांमध्ये अशा विकारांचे प्रमाण अधिक आहे. पचनक्रिया चांगली नसेल तर बद्धकोष्ठ, आतड्यांतील जळजळ किंवा पित्त असे आजार होऊ शकतात.

पोटाचे आजार हे प्रामुख्याने वयाच्या सर्व स्तरावर व सामान्यपणे आढळणारे आहे. वेळीच निदान न मिळाल्यास अजीर्ण तसेच कधीकधी गंभीर स्वरूप धारण करणारे असतात. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात शारीरिक कष्ट कमी झाल्याने व वेळीअवेळी अनावश्यक आहारामुळे पोटाचे आजार हे सहज जडतात. यावर घरगुती उपायांनी कशी मात करता येईल, पे आपण जाणून घेऊ या...

हेही वाचा: आईचा एकच टाहो! माझ्या मुलाचा मृतदेह मला आणून द्या

बडीशेप

बडीशेपेमधील अँटी अल्सर घटक पचन सुधारते व बद्धकोष्ठता दूर करते. बडीशेपेमुळे पोटात थंडावा तयार होऊन जळजळ कमी होते. पित्तामुळे अस्वस्थ वाटत असल्यास बडीशेपाचे दाणे पाण्यात उकळून ते रात्रभर थंड करून ठेवलेले पाणी प्यायल्याने आराम मिळतो.

जिरे

जिऱ्याच्या सेवनामुळे शरीरात लाळ निर्माण होते. त्यामुळे पचन सुधारते, मेटाबॉलीझम सुधारते आणि शरीरातील वायू व गॅसचे विकार दूर होतात. जिऱ्याचे काही दाणे केवळ चघळल्यानेदेखील आराम मिळतो. जिऱ्याचे दाणे पाण्यात उकळून ते पाणी थंड करून प्या. यानेही आराम मिळतो.

हेही वाचा: पावसाचा कहर! विदर्भातील चार युवक गेले वाहून

लवंग

लवंग चवीला तिखट असली तरीही ती अतिरिक्त लाळ खेचून घेते. यामुळे पचन सुधारते आणि पित्ताची लक्षणे दूर करते. लवंगीमुळे पोटफुगी व गॅसचे विकार दूर होतात. पित्ताचा त्रास असेल तर लवंग दाताखाली पकडून ठेवा. यातून येणारा रस काहीकाळ तोंडात राहू द्या. या रसामुळेच पित्ताची तीव्रता कमी होते. लवंगीमुळे घशातील खवखवही कमी होते.

वेलची

आयुर्वेदानुसार वेलची शरीरातील वात, कफ व पित्त यामध्ये समतोल राखण्याचे काम करते. स्वादाला सुगंधी व औषधी गुणांनी परिपूर्ण वेलचीच्या सेवनाने पचन सुधारते. पित्ताचा त्रास कमी होतो. पित्तापासून आराम मिळवण्यासाठी वेलचीचे दोन दाणे ठेचून पाण्यात टाकून उकळा, हे पाणी थंड झाल्यावर प्या.

loading image
go to top