उन्हाळ्यात पुरुषांनी स्ट्रॉबेरी खाण्याचे आहेत फायदे, शारीरिक समस्या होतील दूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

strawberry is very beneficial for men health

महाबळेश्वरची खासियत असलेली स्ट्रॉबेरी केवळ चवीसाठीच नव्हे, तर आरोग्यासाठीही तितकीच गुणकारी आहे.

उन्हाळ्यात पुरुषांनी स्ट्रॉबेरी खाण्याचे आहेत फायदे, शारीरिक समस्या होतील दूर

अनेकांना नकोसा वाटणारा ऋतू म्हणजे उन्हाळा. मार्च महिना सुरु झाला की वातावरणात बदल होतो आणि तापमान वाढू लागतं. त्यामुळे सहाजिकच उष्णतेचे विकार सुरु होतात. उष्णतेच्या विकारांमधील सर्वात त्रासदायक ठरणारी समस्या म्हणजे येणारा सततचा घाम. महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये घाम येण्याचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे अतिघाम आल्यामुळेदेखील पुरुषांमध्ये काही आजार, समस्या निर्माण होतात. त्यामुळेच पुरुषांनी शक्यतो आहारात पाणीदार फळे, पालेभाज्या यांसारख्या पौष्टिक आणि सकस पदार्थांचा समावेश करायला हवा. त्याचसोबत अशी काही फळे आहेत, ज्यामुळे  उन्हाळ्यात पुरुषांना होणाऱ्या शारीरिक समस्या या नक्कीच कमी होऊ शकतात. त्यामुळे या फळांविषयी जाणून घेऊयात.लहानांपासून ते वृद्धांपर्यंत अनेकांच्या आवडतीचं फळ म्हणजे स्ट्रॉबेरी. महाबळेश्वरची खासियत असलेली स्ट्रॉबेरी केवळ चवीसाठीच नव्हे, तर आरोग्यासाठीही तितकीच गुणकारी आहे. स्ट्रॉबेरीचं सेवन केल्यामुळे अनेक पुरुषांमधील शारीरिक समस्या दूर होऊ शकतात.

१. रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात राहते -

स्ट्रॉबेरी खाल्ल्यामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात राहतं. विशेष म्हणजे ही गोष्ट संशोधनातूनदेखील समोर आली आहे. महिलांच्या तुलनेत पुरुष जास्त श्रमाची कामं करतात. त्यामुळे दिवसभर श्रमाची कामं केल्यामुळे शारीरिक थकवा जाणवतो ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी होण्याची शक्यता असते. म्हणूनच पुरुषांनी शक्यतो स्ट्रॉबेरीचं सेवन करावं.

२. कॅन्सरसारख्या आजाराला ठेवते दूर -

कॅन्सरसारख्या आजाराला जर लांब ठेवायचं असेल तर स्ट्रॉबेरीचं सेवन केलं पाहिजे. स्ट्रॉबेरीमध्ये कॅन्सर सेल्स नष्ट करण्याचे गुणधर्म असतात. 

३.मानसिक ताण कमी होतो -

घरातील कर्तापुरुष म्हणून कायमच पुरुषांकडे पाहिलं जातं. त्यामुळे घराची जबाबदारी पार पाडत असताना अनेकदा पुरुषांवर मानसिक ताण येतो. त्यामुळेच स्ट्रॉबेरीचं सेवन केलं पाहिजे. स्ट्रॉबेरीमध्ये ताण कमी करण्याची क्षमता असते.

४. हृदयाशी निगडीत त्रास कमी होतो -

स्ट्रॉबेरी खाल्ल्यामुळे शरीरातील कार्डिओप्रोटेक्टिव्ह अॅक्टीव्ह होतात. त्यामुळे हृदयाशीसंबंधित तक्रारी किंवा समस्या कमी होतात. म्हणूनच स्ट्रॉबेरीचं सेवन हे आवश्य केलं पाहिजे.

५. कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते -

आजकाल अनेकजणांमध्ये कोलेस्ट्रॉलची समस्या असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे ज्यांना कोलेस्ट्रॉलची समस्या आहे त्यांनी स्ट्रॉबेरी खाल्ली पाहिजे. स्ट्रॉबेरीमुळे पुरुषांमधील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते.

६. शारीरिक उर्जा कायम राहते -

सतत उन्हात फिरल्यामुळे किंवा जास्त धावपळ केल्यामुळे शारीरिक थकवा जाणवतो.  परंतु, स्ट्रॉबेरीमध्ये उर्जा टिकवून ठेवण्याची क्षमता असते. त्यामुळे दिवसातून एकदा तरी स्ट्रॉबेरीचं सेवन केलं पाहिजे.

loading image
go to top