Herniaमुळे त्रस्त आहात! पाच गोष्टी लक्षात ठेवल्यास त्रास होईल कमी

हर्निया वाढण्याची अनेक कारणे असू शकतात.
Hernia pain
Hernia painesakal

कमकुवत स्नायू किंवा अविकसित ऊतींचा अनुभव घेत असलेल्या लोकांना हर्नियाचा त्रास होतो. जेव्हा एखाद्या अवयवावर (Body) किंवा आतड्यांवर दबाव पडतो तेव्हा खरा त्रास (Health Problem) सुरू होतो. जसजसे शरीराचे वय वाढते तसे स्नायू आणखी कमकुवत होतात आणि त्याच जागेत निर्माण झालेल्या दबावामुळे सैल स्नायू आणि ऊतींचा जन्म होतो. त्यातूनच हर्निया विकसित होतो. हर्निया ही एक वैद्यकीय (Medical) स्थिती आहे. यात शरीराचा एखादा अवयव स्नायूमध्ये तुटून किंवा उघडून बाहेर येतो. बहुतेक हर्निया तुमच्याओटीपोटात आढळतात. तसेच काहींच्या वरची मांडी आणि मांडीच्या भागातही असतात. हर्निया हा जन्मजात असू शकतो. किंबहुना तो वाढण्याचे हे प्रमुख कारण आहे. तर, वृद्धत्व, जुनी दुखापत, जास्त वजन उचलणे, गर्भधारणा याही गोष्टी कारणीभूत असतात.

Hernia pain
Blood Sugar Level वयानुसार किती असावी? जाणून घ्या
two surgery of kids in kolhapur CPR hospital both successful
two surgery of kids in kolhapur CPR hospital both successful

हार्नियाचे प्रकार (types of Hernia)

इनग्विनल हर्नि(Inguinal Hernia)- हा हर्नियाचा सर्वात सामान्य प्रकार आहे. जेव्हा आतडे कमकुवत ओटीपोटातून बाहेर पडतात तेव्हा असे होते.

हियाटल हार्निया (Hiatal Hernia) - जेव्हा पोट डायाफ्राममधून छातीच्या पोकळीतून बाहेर ढकलले जाते तेव्हा असे होऊ शकते.

नाभीसंबधीचा हर्निया(Umbilical Hernia)- हा मुख्यतः लहान मुलांना किंवा बाळांना होतो. या प्रकारात नाभीद्वारे पोटातून आतडे बाहेर पडते.

Hernia pain
वजन कमी करायचंय! 'या' पाच सवयी असतील तर...
Fitness
Fitness

तुम्ही कशी काळजी घेऊ शकता? (Easy ways to deal with hernia)

1) शरीराचे वजन नियंत्रित ठेवा- शरीराचे वजन नियंत्रणात असताना पोटावर दाब कमी होतो. म्हणूनच, शरीराचे वजन योग्य असणे ही हर्नियाच्या परिणामांवर नियंत्रण ठेवण्याची गुरुकिल्ली आहे.

२) नियमित व्यायाम करा- तुमचे शरीर सुस्थितीत ठेवल्याने हर्निया नियंत्रणात राहण्यास मदत होते. यामध्ये योग आणि दैनंदिन व्यायामाचा समावेश असू शकतो. जड व्यायाम प्रकारात एखाद्याला खाली वाकावे लागते. त्यामुळे हर्नियावर दाब येऊ शकतो म्हणून, तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली सोपे व्यायाम प्रकार निवडण्याचा सल्ला दिला जातो.

३) योग्य आहार घ्या - अयोग्य आहारामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो. जे हर्नियासाठी चांगले नसते. हर्नियाचे सामान्य प्रकार आतड्यांशी संबंधित असतात म्हणूनच निरोगी आहार घेणे महत्वाचे आहे.

Hernia pain
पुरूषांनो, सतत मोबाईल बघितल्याने होतोय तुमच्या शुक्राणूंवर परिणाम! अभ्यासात स्पष्ट
Quitting Smoking
Quitting Smoking esakal

४) जड उजलणे टाळा- शरीर कमकुवत असेल तर हर्निया होण्याची शक्यता अधिक असते. अशावेळी जड वजन उचलले गेल्यास एखाद्या प्रभावित झालेल्या भागात दबाव निर्माण होऊ शकतो. त्यामुळे आणखी अस्वस्थता येते.

५) धुम्रपान टाळा - धूम्रपान केल्याने खोकला होऊ शकतो. त्यामुळे हर्नियावर दाब निर्माण होतो. यामुळे अनेकदा इनग्विनल हर्निया होतो. जास्त खोकला हर्नियासाठी चांगला नाही. कारण त्यामुळे स्नायूंवर दबाव येऊन परिस्थिती आणखी वाईट होते.

Hernia pain
मधूमेही रुग्नांनी कोरोनाच्या 'या' लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नये

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com