हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करताय? 'या' गोष्टी तपासून घ्या

insurance-policy
insurance-policyGoogle

कोरोना महामारीच्या काळात हेल्थ इन्शुरन्स (health insurance)ही अत्यंत गरजेची गोष्ट बनली आहे. या संकटाच्या काळात भरमसाठ येणारी मेडिकल बील भरणे बऱ्याच जणांना शक्य होणार नाही अशा लोकांसाठी अत्यंत गरजेचे आहे. फक्त आरोग्य विमा खरेदी करणे ही प्रत्येक गोष्ट नसते. कोणतीही विमा पॉलिसी खरेदी करण्यापूर्वी त्याबद्दल संपूर्ण माहिती मिळवणे महत्वाचे आहे. योग्य पॉलिसीची निवड करणे गरजेच्या वेळी फायदेशीर ठरते. कोणतीही पॉलिसी त्याच्या किंमत पाहून खरेदी करणे ही सर्वात मोठी चूक आहे.

प्रत्येक स्वस्त विमा पॉलिसी चांगली असेलच असे काही नाही. किंमतीसोबतच त्या पॉलिसीमध्ये मिळणारे इतर फायदे देखील विचारात घेतले पाहिजेत. पॉलिसी प्रीमियमवर कंपनीकडून कोणते फायदे दिले जात आहेत ते तपासून पाहिले पाहिजेत. आज आपण पॉलिसी घेताना कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत या बद्दल जाणून घेणार आहोत. (these-deatails-you-should-know-while-buying-health-insurance-policy)

पॉलिसी घेण्यापूर्वी सर्वप्रथम पॉलिसीचे कव्हरेज जाणून घ्या. त्यामध्ये कोणते रोग आणि फायदे देण्यात येत नाहीत याची माहिती करुन घ्या. त्याच्या पॅनेलमधील सर्व रुग्णालयांची सर्वोच्च मर्यादा किती आहे, डॉक्टरांची फीस किती आहे, आयसीयूमध्ये अॅडमीट होण्यासाठी घेण्याच्या किती तासांची मर्यादा आहे हे देखील तपासा त्यासोबतच कोणत्या परिस्थितीत पॉलिसीधारक क्लेम करु शकत नाहीत हे देखील तपासून घ्या.

पॉलिसीमध्ये नवीन काय आहे?

सर्व हेल्थ इंन्शुरंस पॉलिसीमध्ये काही अपवाद असतात. असे काही ठराविक आजार आणि इतर प्रसंगी पॉलिसीधारक समावेश करत नाहीत. बहुतेक पॉलिसीमध्ये आजारपण, युद्ध, रेसिंग किंवा आत्महत्येचा प्रयत्न यासारख्या घटनांमुळे होणारे नुकसान याचा समावेश केलेला नसतो. इतर पॉलिसींची तुलना करून आपण याची खात्री करुन घेऊ शकता. सोबतच या पॉलिसीमध्ये इतरांपेक्षा वेगळं काय आहे हे देखील तपासून पाहू शकता.

insurance-policy
१५ दिवसानंतर टर्म इन्शुरन्स महागणार, जाणून घ्या किती वाढणार प्रीमियम

ठरलेली रक्कमच असेल रीइम्बर्स

बर्‍याच विमा पॉलिसींमध्ये शस्त्रक्रिया, खोलीचे भाडे आणि आयसीयू चे बील यासाठी काही मर्यादा असतात. काही पॉलिसींमध्ये हे स्पष्टपणे सांगितले जाते की एका विशिष्ट मर्यादेपेक्षा अधिक खोलीचे भाडे परतफेड केले जाणार नाही. उदाहरणार्थ, 2 लाखांच्या सम अॅश्युअर्ड पॉलिसीमध्ये खोलीच्या भाड्यासाठी फक्त 2000 रुपये परतफेड केली जाते. या सर्व सब लिमीट्स जाणून घेण्यासाठी पॉलिसीची कागदपत्रे नीट वाचली पाहिजेत. जर विमा पॉलिसीची सब लिमीट्स कमी असतील आणि आपण चांगल्या सुविधा असलेल्या खोलीत राहात असाल तर खोलीचे भाडे आपल्याला खिशातून खर्च करावे लागेल. त्याचप्रमाणे पॉलिसीमध्ये मोतीबिंदू, हिस्टरेक्टॉमी आणि अपेंडिसिस इत्यादीसारख्या विशिष्ट शस्त्रक्रियेसाठी सब लिमीट्स देखील दिलेले असतात. म्हणून पॉलिसी खरेदी करताना हे लक्षात ठेवले पाहिजे की परवडणार्‍या पॉलिसींमध्ये सब लिमीट्स आणि निर्बंध असतातच.

insurance-policy
तुमचा हेल्थ इन्शुरन्स क्लेम कंपनीने नाकारला, तर येथे करा तक्रार

रिस्टोरेशन बेनिफिट

प्रत्येक हेल्थ इंन्शुरन्स प्लॅनमध्ये अॅश्युअर्ड लिमीट असते जी पॉलिसीधारकाच्या आरोग्यावर अवलंबून असते. एका वर्षात या विम्याच्या रकमेवर दावा करण्यासाठी मर्यादा आहे. जर किंमत जास्त असेल तर पॉलिसी धारकाला स्वतःच पैसे द्यावे लागतील. परंतु जर आपण रिस्टोरेशन बेनिफिटसह प्लॅन घेतला असेल तर विमाधारक विम्याची रक्कम रिस्टोर होईल जेणेकरून जर पॉलिसीधारक त्याच वर्षी पुन्हा आजारी पडला तर विम्याची रक्कम उपलब्ध होईल. मात्र रिस्टोरेशन बेनिफिट फक्त त्या वेळीच उपलब्ध असेल जेव्हा एकाच वर्षात वेगवेगळ्या रोगांचा उपचार केला गेला असेल. एका वर्षात एकाच रोगासाठी परत विमा रक्कम मिळत नाही.

रुग्णालये उपलब्ध आहेत का?

रुग्णालयांकडे हेल्थ पॉलिसी डॉक्यूमेंट्समध्ये त्यांच्या समन्वयकांची यादी असते. पॉलिसीधारकाने ही यादी काळजीपूर्वक वाचली पाहिजे. तसेच, आपल्या घराजवळ कोणती रुग्णालये आहेत हे देखील पाहिले पाहिजे. जर आपणास यादीमध्ये नसलेल्या रूग्णालयात दाखल केले असेल तर रुग्णाला कॅशलेस उपचार मिळणार नाहीत. रुग्णालयाचे एकूण बिल रुग्णाला स्वत: च्या खिशातून द्यावे लागेल. त्यानंतर ही रक्कम परतफेड केली जाईल.

त्याला को-पेमेंट देखील म्हणतात. पॉलिसीधारक रुग्णालयात भरती होण्याच्या वेळी दिलेली रक्कम को-पेंमेट होय ही रक्कम विमा कंपनीकडून भरलेली असते. ज्येष्ठ नागरिकांसाठी बहुतेक आरोग्य विमा योजनांमध्ये को-पेमेंट करणे अनिवार्य आहे. पण काही विमा कंपन्या को पेमेंट रक्कम निश्चित ठेवतात. काहींनी रेंज सेट केली ती 10 ते 20 टक्क्यांच्या दरम्यान असते. तुम्ही को-पेमेंटची अट नसलेला प्लॅनच खरेदी करने चांगले ठरते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com