बाजरीची भाकरी खाई... तो आजारापासून दूर राही...

हिवाळ्यात ही भाकरी खाल्ल्याने पाच प्रकारचे फायदे होऊ शकतात
bajri bhakri
bajri bhakriesakal

हिवाळ्यात मिळणारे विविध पदार्थ आरोग्यासाठी अतिशय पौष्टीक समजले जातात. त्यामुळे प्रतिकारशक्ती ( Immunity health) चांगली राहावी यासाठी अनेकजण आहारात (Food) अशा पदार्थांचा समावेश करतातच. त्यामुळेच की काय आहारतज्ज्ञही हंगामी अन्न खाण्यावर भर देतात. तसेच, हंगामी आणि स्थानिक पदार्थ ऋतुमानानुसार काम करण्यास मदत करतात. म्हणूनच थंडीत बाजरी खाणे अतिशय महत्वाचे आहे. बाजरी पौष्टीक घटक म्हणून ओळखली जाते. अनेक घरात बाजरीची भाकरी आवर्जून केली जाते. त्यामुळे ही भाकरी खाल्ल्याने अनेक फायदे होतात.

बाजरीत हे आहेत घटक

थंडीत (winter) रोजच्या आहारात (Food) बाजरीचा समावेश केलात तर फायदा होईल. कारण, बाजरीत कर्बोदके २५ टक्के, फायबर १७ टक्के, प्रथिने २२ टक्के, उष्मांक ७५६ किलो कॅलरीज, जीवनसत्त्व बी ६ - ७६८ मायक्रो मि.ली., जीवनसत्त्व ई १०० मायक्रो मि.लि., कॅल्शियम १६ मि.लि., लोह ६ मि.लि., मॅग्नेशियम २२८ मि.लि. ग्रॅम असते.

bajri bhakri
थंडीत संत्री खाणे फायद्याचे, शरीराला होतात 'हे' 5 फायदे
Bajari
Bajari

असे आहेत फायदे

पचनक्रियेचा त्रास होतो कमी

आरोग्याच्या (Health) दृष्टीने बाजरी खाण्याचे अनेक फायदे आहेत. बाजरीचं पीठ ग्लूटेन मुक्त असते. त्यामुळे बाजरीची भाकरी हिवाळ्यात खाल्ल्यामुळे पोटाशी आणि पचनक्रियेशी संबंधित समस्या दूर होतात. पोटाच्या विकारांपासून दूर राहण्यासाठी बाजरीची भाकरी हा उत्तम मार्ग आहे.

वजन कमी करण्यासाठी मदत

वजन (Weight Loss)कमी करायचे असेल तर बाजरीची भाकरी खाण्याचा सल्ला आहारतज्ज्ञ देतात. ही भाकरी खाल्ल्यामुळे पोट भरल्यासारखे वाटते. त्यामुळे आपण जास्त खाणे टाऴतो. तर बाजरीत असलेल्या प्री-बायोटिकमुळे मधुमेहाच्या रुग्णांनाही डॉक्टर जेवण्यात बाजरी भाकरी खायला सांगतात.

बाजरीच्या पिठात ओमेगा 3 फॅटी ऍसिड

ओमेगा 3 (Omega 3)फॅटी अॅसिड हे शरीरासाठी आवश्यक असते, हे पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्स असून ते फक्त अन्नपदार्थांतून मिळते. त्यामुळे बाजरीची भाकरी खाल्ल्यामुळे शरीराला ओमेगा ३ मिळते. बाजरीच्या पिठात सर्वात जास्त ओमेगा 3 फॅटी अॅसिड आढळते.

bajri bhakri
हिवाळ्यात कर्ली हेअर्सची चिंता सतावतेय, अशी घ्या काळजी
Heart-Attack
Heart-AttackSakal

रोगप्रतिकारक शक्ती वाढते

बाजरीच्या भाकरीमुळे (Bajari bhakari)तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. तसेच बाजरीमुळे तुमच्या शरीरात जमा झालेले विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत होते. त्यामुळे याचा फायदा किडनी आणि यकृताला होतो.

हृदयासाठी फायद्याचे

बाजरीत मॅग्नेशियम, पोटॅशियम हे घटक असल्याने बीपी (BP)आणि हृदयाच्या (Heart)समस्या असलेल्या रुग्णांना डॉक्टर बाजरीची भाकरी खाण्याचा सल्ला देतात. बाजरीत उष्णतेचे प्रमाण जास्त असल्यानं शरीरात ऊर्जा निर्माण होते आणि त्यामुळे कोलेस्टेरॉलची पातळी कमी राहते.

bajri bhakri
हिवाळ्यात चिमुकल्यांची अशी घ्या काळजी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com