Diabetes Symptoms: हे चार संकेत म्हणजे हमखास मधुमेह

सध्या अनेक तरूण मुलांना या आजाराने ग्रासले आहे
 Diabetes Symptoms
Diabetes Symptoms

बदलती जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयी या अनेक आजारांना आमंत्रण देत आहेत. जगभरात मधुमेहाचे (Diabetes) रूग्ण झपाट्याने वाढत आहेत. मधुमेह कुठल्याही वयात होऊ शकतो. सध्या अनेक तरूण (Young Age)मुलांना या आजाराने ग्रासले आहे. मधुमेह असल्यास सुरूवातीला काही लक्षणे (Symptoms)लगेच दिसतात. पण त्याकडे आपले फारसे लक्ष जात नाही. त्यामुळे तुमच्या शरीरात जर अशाप्रकारचे बदल होत असतील तर अधिक काळजी घेण्याची गरज असते. जर तुम्ही मधुमेहाने ग्रस्त असाल तर या संकेतांकडे दुर्लक्ष करू नका. डॉक्टरांकडे जा. अन्यथा तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

 Diabetes Symptoms
Blood Sugar Level वयानुसार किती असावी? जाणून घ्या
TOILET PROBLEM
TOILET PROBLEMESAKAL

१) सारखी सारखी बाथरूमला लागणे- सारखी बाथरूमला लागणे हे मधुमेहाचं अत्यंत सामान्य लक्षण आहे. पण हे सर्वात प्रमुख लक्षण मानलं जातं. मधुमेहामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू लागते, त्यामुळे त्यावर नियंत्रण ठेवणे कठीण जाते. अतिरिक्त ग्लुकोज लघवीद्वारे शरीरातून बाहेर पडते. जर वारंवार लघवीला जावे लागत असेल, सतत असे वाटत असेल, तर लगेच मधुमेहाची तपासणी करून घ्या.

 Diabetes Symptoms
Diabetes असताना रात्रीचा रक्तदाब वाढतोय? जीवाचा धोका आत्ताच ओळखा
walking
walkinggoogle

२) चालताना सारखे अडखळणे - काही वेळा अचानक पाय सुन्न झाल्याची जाणीव होते. तसेच चालताना अडखळायला होते. असे जर सारखे सारखे होत असेल तर ते मधुमेहाचे सुरवातीचे लक्षण असू शकते. पायात सारख्या मुंग्या येत असतील. चालताना तोल जातोय असे वाटत असेल तर याकडे दुर्लक्ष करू नका.

 Diabetes Symptoms
महिलांना पोस्टपार्टम डिप्रेशन कशामुळे येतं? ही लक्षणे दिसल्यास सावध राहा
Eyes
EyesSakal

३) डोळ्यांवर परिणाम- मधुमेहाचा डोळ्यांवर लगेच परिणाम होतो. सुरुवातीच्या लक्षणांमध्ये तुमची दृष्टी कमी होऊ लागते. अंतर नीट दिसत नाही. तुम्हालाही असा त्रास जाणवत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. लगेच डॉक्टरांकडे जाऊन डोळे तपासून घ्या.

 Diabetes Symptoms
लग्नानंतर अनेक वर्षांनी नवरा-बायको विभक्त का होतात? जाणून घ्या कारणे
skin problem
skin problem

४) त्वचेत बदल- मधुमेह असलेल्यांच्या त्वचेवर गडद काळे डाग दिसतात, हे सुरुवातीच्या लक्षणांपैकी एक आहे. अंडरआर्म्स किंवा घशात असे डाग दिसत असल्यास अधिक लक्ष द्या. त्वचेला स्पर्श केल्यावर ती मऊ वाटत असेल तर हे प्री-डायबिटीजचे लक्षण आहे. शरीरातील इन्सुलिनची पातळी वाढल्यामुळे असे घडते. तसेच त्वचेवर झालेली जखम किंवा जखम लवकर भरून न येणे हेही लक्षण असते. अशावेळी लवकरात लवकर डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घ्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com