पाण्याचे प्रमाण जास्त असलेल्या भाज्या खाऊन कमी करा वजन!

अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धनने याविषयी ट्रिक्स सांगितल्या आहेत
Vegetables
Vegetablesesakal

वजन कमी करणे हे अनेकांना आव्हानात्मक वाटते. कारण त्यात हेल्दी डाएट, वर्कआऊट करणे महत्वाचे असते. पण, वजन कमी करण्याचा (Weight Loss) प्रयत्न करताना काय खावे आणि काय खाऊ नये (Diet) याबद्दल बहुतेकजण गोंधळलेले असतात. इंटरनेटवर याविषयी भरपूर माहिती उपलब्ध आहे. अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन फिटनेससाठीही (Fitness) ओळखली जाते. तीने नुकताच वजन कमी करण्यासाठी आपल्या आहारात पाण्याचे प्रमाण जास्त असलेल्या भाज्या खाणे कसे फायद्याचे असते ते सांगितले आहे.

Vegetables
महिन्यात ५ किलो वजन कमी करायचंय? हा घ्या डाएट प्लॅन

भाग्यश्रीने तिच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले, “तुम्ही तुमचे वजन बघता का? पाण्याचे प्रमाण जास्त असलेल्या भाज्या खा. आपल्या शरीराच्या योग्य कार्यासाठी पाणी आवश्यक आहे. ते दररोज पुन्हा भरले जाणे आवश्यक आहे, कारण आपल्या सर्व चयापचय क्रियांना शरीरातून विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. या water vegetables मुळे शरीराला अधिक कार्यक्षमतेने काम करण्‍यास मदत मिळणे सोपे होते. त्यामुळे तुमच्या रोजच्या जेवणात या गोष्टींचा समावेश करा. भाग्यश्री व्हिडिओमध्ये पुढे सांगते की, तुमच्या शरीरात 70% पाणी कुठल्या भाज्यांमुळे मिळू शकते.

Vegetables
३ सेकंद व्यायाम केल्याने वाढते स्नायूंची ताकद, अभ्यासात स्पष्ट

या भाज्या खाणे फायद्याचे

दूधी, पालक, टोमॅटो, कोबी, काकडी, लेट्युस आणि झुकीनी या पाण्याचे प्रमाण जास्त असलेल्या भाज्या आहेत. या भाज्यांमुळे फायबर तर मिळतेच. शिवाय पचनही चांगले राहते. इन्सुलिनची पातळी राखण्यासाठी त्याचा फायदा होता. यात कॅलरीज कमी असतात. जे डाएटींग करतता किंवा वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठी अशा भाज्या खाणे फायद्याचे आहे.

Vegetables
तुमचा डाएट प्लॅन असा आखा! वजन होईल कमी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com