
डॉ. मृदुल देशपांडे- MBBS, फंक्शनल मेडिसिन नूट्रिशनिस्ट
आजच्या धावपळीच्या जीवनात सर्वांत जास्त त्रास देणारी समस्या म्हणजे निद्रानाश. उपाय म्हणून झोपेच्या गोळ्या घेतल्या जातात; पण खरा प्रश्न असा आहे, की आपल्याला झोप का लागत नाही? आपलं शरीर एका विशिष्ट घड्याळानुसार चालतं. सूर्यास्तानंतर अंधार पडताच शरीरात मेलॅटोनिन नावाचं संप्रेरक तयार होतं, जे झोप लागण्यास मदत करतं. सकाळी सूर्यप्रकाश मिळाल्यावर शरीरातून कॉर्टिसोल हॉर्मोन स्रवला जातो ज्याने ऊर्जा मिळते. ही प्रक्रिया विस्कळीत झाली, की निद्रानाश सुरू होतो.