पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी ORS आहे वरदान

पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी ORS आहे वरदान
Updated on
Summary

ORSच्या मदतीने अतिसारामुळे शरीरात पाण्याची मात्रा कमी असेल तर ORSच्या मदतीने दूर करता येते.

पुणे: जागतिक ओआरएस (ORS)हा दिवस दरवर्षी 29 जुलै रोजी साजरा केला जातो, जेणेकरून आपल्या सर्वांना ओरल रीहाइड्रेशन साल्ट्स (Oral Rehydration Salts) चे महत्त्व कळू शकेल. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे म्हणणे आहे की, पाच वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये डायरिया संबंधी (Diarrhoeal Diseases) चे समस्या असतात. ORSच्या मदतीने अतिसारामुळे शरीरात पाण्याची मात्रा कमी असेल तर ORSच्या मदतीने दूर करता येते. ORS केवळ मुलांसाठीच नाही तर प्रौढ आणि वृद्ध लोकांमध्ये डिहाइड्रेशन (पाण्याची कमी) असलेली समस्यादेखील दूर करते.

पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी ORS आहे वरदान
ORS जलसंजीवनी आहे डायरियासाठी आरोग्यवर्धक पेय

ORS म्हणजे...

नॅशनल हेल्थ पोर्टल म्हणते की, ORSचा फूल फार्म म्हणजे ओरल रीहायड्रेशन साल्ट्स, जे अतिसाराच्या समस्येवर मात करण्यासाठी सर्वात किफायतशीर उपचार आहे. त्यात मीठ (इलेक्ट्रोलाइट) आणि साखर असते. या दोन्हींच्या संयोगाने शरीरातील आतड्यातून (पोटात) इलेक्ट्रोलाइट्स आणि पाण्याचे शोषण गतिमान होते.

जे अतिसारामुळे होणार्‍या उलट्या आणि अतिसारापासून आराम देते. त्याचबरोबर, अतिसारामुळे शरीरात पाणी आणि मीठाची कमतरता दूर करण्यात मदत होते. नॅशनल हेल्थ पोर्टल ऑफ इंडियाच्या म्हणण्यानुसार, ORS सह झिंकचे (Zinc) संयोजन तीव्र अतिसार आणि निर्जलीकरणासाठी सर्वात प्रभावी उपचार आहे.

पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी ORS आहे वरदान
World Health Day 2021: 'सेवाभाव उरला नाही, आपला प्रवास उलट्या दिशेने'

कोणत्या वयात, किती ORS घ्यावे...

ORS पॅकेटवर दिलेल्या निर्देशानुसार (ORS सोल्यूशन कसे तयार करावे) पाणी मिसळा आणि खालील प्रमाणात ओआरएस घ्या.

- 2 वर्षांच्या खालील मुले: प्रत्येक वेळी अतिसार झाल्यावर ORS सोल्यूशनचे किमान 1/4 किंवा 1/2 मोठे कप (कप आकार - 250 मिली) घ्या. दर 2 ते 3 मिनिटांनंतर 1-2 चमचे ORS घ्या.

- 2 वर्ष किंवा त्यावरील मुले: अतिसारा नंतर 1/2 ते 1 कप (कप आकार - 250 मिली) ORS घ्या.

- 12 वर्षांवरील मुले, प्रौढ आणि वृद्ध: प्रत्येक अतिसारा नंतर 1 ते 2 कप म्हणजे 250 ते 400 मिली ORS घ्या.

पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी ORS आहे वरदान
दूध पिल्यानंतर कधी कधी लहान मुलं उलट्या का करतात ते जाणून घ्या

ORS घेतानाची सुरक्षितता

- ORS तयार करताना, पॅकेटवर दिलेल्या सूचनांचे पालन करा. योग्य प्रमाणात पाणी मिसळा.

- ORS द्रावण 24 तासांपेक्षा जास्त ठेवू नये. कारण त्यात बॅक्टेरिया वाढू शकतात.

- ORS पावडरमध्ये खराब पाणी मिसळू नका. तुम्ही पहिला पाणी उकळवा आणि नंतर ORS द्रावण तयार करण्यासाठी थंड करा.

- ORS फक्त पाण्यात मिसळा. यासाठी दूध, सूप, ज्यूस, सॉफ्ट ड्रिंक वापरू नका.

- ORS मध्ये साखर घालू नका.

- ORS प्यायल्यानंतर उलट्या, चक्कर येणे इ. ची समस्या गंभीर असल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी ORS आहे वरदान
अमेरिका-चीन संबंधांचे काटे उलट्या दिशेने

घरी असे तयार करा ORS Solution...

- 1 लिटर स्वच्छ पाणी, 6 चमचे साखर (सुमारे 30 ग्रॅम), मीठ अर्धा चमचा मिसळून ORS Solution बनवा.

ORS Solution पिण्याचे फायदे...

- डिहाइड्रेशन (पाण्याची कमी) दूर होतो.

- डायरिया दूर करते.

- थकवा आणि अशक्तपणा दूर होतो.

- एक्सरसाइजसाठी ऊर्जा मिळते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com