विशेष : घरीच्या घरी व्यायामासाठी ‘फिटनेस अॅप्स’

आरोग्यासाठी व्यायाम करणं आवश्यक आहे, मात्र, व्यग्र जीवनशैलीमुळे ते सर्वांनाच जमते, असे नाही. यावर टेक्नोसॅव्ही युजर्ससाठी व्यायामाची अॅप्स उपयोगी ठरतात.
विशेष : घरीच्या घरी व्यायामासाठी ‘फिटनेस अॅप्स’

आरोग्यासाठी व्यायाम करणं आवश्यक आहे, मात्र, व्यग्र जीवनशैलीमुळे ते सर्वांनाच जमते, असे नाही. यावर टेक्नोसॅव्ही युजर्ससाठी व्यायामाची अॅप्स उपयोगी ठरतात. आजच्या युवा वर्गाची आवड लक्षात घेऊन विविध कंपन्यांनी

  • होम वर्कआउट

  • टोटल फिटनेस,

  • जिम वर्कआउट,

या नावांची फिटनेस अॅप्स विकसित केली आहेत. ही अॅप्स फोरआर्म्स, अॅब्ज, बायसेप्स, कार्डिओ यांचे किती सेट्स मारायचे, डंबेल्स किती आणि कसे उचलायचे, प्रत्येक प्रकार किती वेळ करायचा याची परिपूर्ण माहिती फोटोसह देतात. विशेषतः महिलांमध्ये ही अॅप्स अधिक लोकप्रिय आहेत.

योगा अॅप्स

योगाची महती विविध माध्यमांद्वारे कानी पडत असल्याने अनेक जण आवर्जून योग शिकण्याचा प्रयत्न करतात. पण अनेकांना योगाचे क्लासेस लावणे शक्य नसते. त्यामुळे योगाची आवड असणाऱ्यांसाठी ‘योगासन’, ‘डेली योगा’ ही अॅप्स उपलब्ध आहेत.

  • ‘योगासन’ ॲपमध्ये प्रत्येक आसन कसे करायचे आणि त्याचे फायदे यांची सविस्तर माहिती कृतीसह दिलेली आहे. ‘गूगल’ फिट व ‘फिटनेस ट्रेनर’ या मोबाईल अॅप्समध्ये नेहमीच वर्कआऊट प्लॅन आपण सेव्ह करू शकतो. हे अॅप्स अँड्रॉईड व जावा फोन्समध्ये प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करू शकतो.

  • ‘डेली योगा’ ॲपची मदत योगाचे महत्त्व पटवून देण्यासाठी केली जाते. यात योगाचे महत्त्व आणि त्याचे विविध प्रकार यांची सचित्र माहिती आहे. कोणती आसने किती वेळेत करायची आणि कशी करायची याबाबत माहिती आहे. यात पाचशेहून अधिक आसनांची माहिती, एचडी फॉरमॅटमधील व्हिडिओ उपलब्ध आहेत आणि प्रत्येक व्हिडिओला सुश्राव्य मंद संगीताची जोड दिलेली आहे. हे अॅप ॲन्ड्रॉईड ३.० आणि त्यापुढील ‘ओएस’साठी उपलब्ध आहे.

  • पॅरेंट योगा या विविध भाषांत उपलब्ध असणाऱ्या अॅपमध्ये योग तज्ज्ञांशी संवाद साधण्याची संधी युजर्सना मिळते. तसेच, महिलांना गरोदरपणात आणि त्यानंतर गर्भवती महिलांनी बाळाची, तसेच स्वत:ची कशी काळजी घ्यावी, कोणती योगासने करायची याची विस्तृत माहिती दिली आहे.

  • नॅचरल फेसलिफ्ट हे महिलांसाठी अतिशय उपयुक्त ॲप असून, ते ८५ भाषांमधून माहिती देते. चेहऱ्यावरील सौंदर्य खुलविण्यासाठी ‘फेशियल योगा’ महत्त्वाचा ठरतो. या अॅपमध्ये तुम्हाला फक्त दहा सोपे व्यायाम सांगितले आहेत. यामुळे चेहऱ्यावरील फॅट्‌स कमी होण्यास मदत होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com