१0 कोटींहून अधिक भारतीयांना झोपेशी संबंधित 'या' गंभीर आजाराची शक्यता; एम्सच्या अभ्यासातून खुलासा

ऑब्सट्रॅक्टिव्ह स्लीप एपनिया(OSA) हा झोपेशी संबंधित असलेला श्वासोच्छवासाचा एक आजार आहे.
obstructive sleep apnea
obstructive sleep apnea esakal

Obstructive Sleep Apnea : ऑब्सट्रॅक्टिव्ह स्लीप एपनिया(OSA) हा झोपेशी संबंधित असलेला श्वासोच्छवासाचा एक आजार आहे. मागील काही वर्षांमध्ये जगभरात या आजाराने पीडित असलेल्या रूग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे, हा आजार गंभीर स्वरूप धारण करताना दिसत आहे.

या आजाराची व्यापकता आणि मेटा विश्लेषणातून अशी माहिती समोर आली आहे की, २५ ते ४७ या वयोगटातील तब्बल १०.४ कोटी भारतीय या आजाराने पीडित असण्याची शक्यता आहे.

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (एम्स) नवी दिल्लीच्या संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार जवळपास ११ टक्के भारतीय प्रौढ ओएसए या आजाराने पीडित आहेत. ज्यामध्ये महिलांच्या तुलनेत (५%) पुरूषांना (13%) या आजाराचा धोका जास्त आहे.

स्लीप मेडिसिन रिव्यूज जर्नल

'टाईम्स ऑफ इंडियाने' या संदर्भात वृत्त प्रकाशित केले आहे. स्लीप मेडिसिन रिव्यूज जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या एका अभ्यासात असे म्हटले गेले आहे की, ओएसए हा एक झोपेशी संबंधित असलेला श्वासोच्छवासाचा एक आजार आहे. हा आजार मोरबिडिटिशी निगडीत आहे.

संशोधन करणाऱ्या टीमने या संदर्भात अभ्यास करताना मेडलाईन, एम्बेस आणि स्कोपस डेटाबेस या संदर्भात रिसर्च केला. ज्यामध्ये स्लीप स्टडीचा वापर करून सामान्य भारतीय प्रौढ लोकसंख्येमध्ये ओएसए (OSA) या आजाराच्या व्यापकतेची माहिती देण्यात आली होती.

obstructive sleep apnea
Sleep Cause Alzheimer's : झोपेच्या कमतरतेमुळे अल्झायमर होऊ शकतो का?

या अभ्यासामध्ये जवळपास ३५.५ ते ४७.८ वयापर्यंतच्या ११,००९ विषयांचा समावेश करण्यात आला होता. यासाठी रेंडम-इफेक्ट्स मॉडेलचा ही वापर करून मेटा अ‍ॅनालिसिस करण्यात आले होते.

या निष्कर्षांचा आधारे आणि संशोधनातून हे समोर आले आहे की, कामकाज वर्ग अर्थात २५ ते ४७ च्या वयोगटातील जवळपास १०.४ कोटी भारतीय ओएसए या आजाराने पीडित आहेत. ज्यामध्ये ४७ कोटी भारतीय मध्यम ते गंभीर या ओएसएच्या स्टेजमध्ये आहेत. ही अतिशय गंभीर बाब आहे.

ऑब्सट्रॅक्टिव्ह स्लीप एपनिया(OSA) काय आहे ‘हा’ आजार

हा झोपेशी संबंधित श्वासोच्छवासाचा एक आजार आहे. ज्यामुळे, व्यक्तीचा झोपेत असताना श्वासोच्छवास वारंवार थांबतो आणि मध्येच पुन्हा सुरू होतो. महत्वाची बाब म्हणजे या आजाराने पीडित असलेल्या व्यक्तीची झोपेत श्वास घेण्याची प्रक्रिया बंद होते, आणि त्या व्यक्तीला याची पुसटशी जाणीवही होत नाही.

झोपेच्या वेळी श्वासोच्छवास थांबण्याची ही समस्या काही सेकंदांपासून ते १ मिनिटांपर्यंत असू शकते. स्लीप एपनियाचे अनेक प्रकार आहेत आणि ऑब्सट्रॅक्टिव्ह स्लीप एपनिया हा त्यापैकीच असलेला एक प्रकार आहे आणि या आजाराने पीडित असलेल्या लोकांची संख्या जगभरात वाढत चालली आहे. ही अतिशय चिंतेची बाब आहे.

obstructive sleep apnea
Yoga for Better Sleep: रात्री लवकर झोप येत नाही? मग ही योगासनं करून बघा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com