Tea Health Risks: 99% लोक अयोग्य वेळी अन् चुकीच्या पद्धतीने पितात चहा, वाढू शकते 'या' आजारांचा धोका, जाणून घ्या डॉक्टर काय सांगतात?

best time to drink tea: अनेक लोकं दिवसाची सुरूवात ही चहाने करतात. तसेच भारतात अनेक लोक सकाळी चहा प्यायल्याने ऊर्जा वाढते असे मानतात. चहा पिण्याची चुकीची वेळ आणि बनवण्याची पद्धत अनेक आजारांच कारण ठरू शकते. यामुळे कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या हे डॉक्टरांकडून सविस्तरपणे जाणून घेऊया.
best time to drink tea:
best time to drink tea: Sakal
Updated on

best time to drink tea: अनेक लोकं दिवसाची सुरूवात ही चहाने करतात. तसेच भारतात अनेक लोक सकाळी चहा प्यायल्याने ऊर्जा वाढते असे मानतात. तर अनेक लोक नाश्तासोबत चहा पितात. अनेक लोक सकाळी दूधाचा चहा पितात. भारतातील जवळपास ९९ टक्के लोक सकाळी रिकाम्या पोटी किंवा नाश्त्यासोबत चहा पितात.

चहा पिण्याची ही चुकीची वेळ आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. तसेच चहा बनवण्याची पद्धत देखील चुकीची असते. याप्रकारे चहा प्यायल्याने कुपोषणाची समस्या वाढू शकते. अमेरिकेतील हेमॅटोलॉजिस्ट ऑन्कोलॉजिस्ट डॉ. रवी के गुप्ता यांच्या मते रिकाम्या पोटी चहा पिणे हृदयाच्या आरोग्यासाठी घातक असते. तसेच अॅसिडिटीचा त्रास वाढू शकतो. चला तर मग जाणून घेऊया सकाळी चहा ऐवजी कोणत्या पेयाचे सेवन करावे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com