Alcohol Side Effects : दारु पिल्याने होतो थेट फर्टीलिटीवर परिणाम

जास्त प्रमाणात अल्कोहोल घेतल्याने काय दुष्परीणाम होतात, या विषयी जाणून घेऊया.
Alcohol Side Effects
Alcohol Side Effectssakal

Alcohol Side Effects : दारुचे सेवन हे शरीरासाठी हानिकारक आहे, हे सर्वांनाच माहिती आहे तरीसुद्धा अनेकजण दारुचे सेवन करतात. दारुच्या सेवनाने कित्येक आजार आपण ओढावून घेतो. जास्त प्रमाणात अल्कोहोल घेतल्याने काय दुष्परीणाम होतात, या विषयी जाणून घेऊया. (Alcohol disadvantages news)

मद्यपानामुळे लिव्हर हार्टवर परिणाम होतो पण पुरुष आणि स्त्रीमधील विचार केला तर मद्यपानाचा सर्वात जास्त परिणाम हा महिलांवर होतो. आज आपण मद्यपानाचे महिलांवर कोणते दुष्परीणाम होतात, याविषयी जाणून घेणार आहोत.

Alcohol Side Effects
Winter lifestyle : गुलाबी थंडी वाढताच बदलली लाईफस्टाईल; फिरणे अन् व्यायामाचे प्रमाण वाढले
  • अल्कोहोलच्या अतिसेवनामुळे स्त्रियांमध्ये गर्भपात किंवा जन्मजात मुलांवर आजाराचा धोका वाढतो.

  • मासिक पाळीच्या दरम्यान अल्कोहोलच्या सेवनाने अति रक्तस्त्रावाचीही समस्या होऊ शकते.

  • याशिवाय महिलांना स्तनाच्या कर्करोगाचाही सामना उद्भवू शकतो.

  • सोबत गर्भधारणेदरम्यान महिलांनी अल्कोहोलाचे सेवन केल्यास बाळाला फेटल अल्कोहोल स्पेक्ट्रम डिसऑर्डरचा धोका वाढतो.

Alcohol Side Effects
Mental Health: वीकेंडला असतात लोकं जास्त डिप्रेस...
  • दारू प्यायल्याने पुरुषांशिवाय महिलांमध्येही लिव्हर सिरोसिसची समस्या अधिक होऊ शकते.

  • याशिवाय दारुमुळे महिलांच्या मेंदूवरही परिणाम होऊ शकतो.

  • जर दारु पिल्यानंतर कोणत्याही आरोग्यदायी समस्या जाणवल्या तर त्वरीत डॉक्टरांशी संपर्क करणे गरजेचे आहे.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com