Health Tips : डोक्यातले विचार थांबतच नाही? ४ उपाय डोकं शांत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Health Tips

Health Tips : डोक्यातले विचार थांबतच नाही? ४ उपाय डोकं शांत

संवादातून विचारांची, भावनांची, माहितीची देवाणघेवाण, नीचरा होतो. त्यामुळे संवादाला फार महत्व आहे. इतरांशी संवाद साधताना स्वतःशीपण संवाद साधावा याला फार महत्व आहे. त्यामुळे विचारांमध्ये स्पष्टता येते. पण याचे प्रमाण जास्त झाले तर मानसिक आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. सतत स्वतःशी संवाद साधणे किंवा आपल्याच विचारांमध्ये गुंग असणारी माणस आपल्या आजूबाजूला पाहतो. पण स्वतःच्याच विचारांत गुंग असणाऱ्या माणसांना खूप समस्यांना तोंड द्यावे लागते. यांना विसराळूपणा, झोप न लागणे अशा समस्यांना सामोरे जावे लागते.

हेही वाचा: Health Tips: दिवसा जेवणानंतर झोपल्याने बिघडतं आरोग्य; वाचा आयुर्वेदाचे नियम

हे विचार थांबवण्यासाठी काय करावे ?

मोठ्याने बोला

आपल्याला पडलेले प्रश्न, अडचणी सोडवण्यासाठी, निर्णय घेण्यासाठी सामान्यपणे स्वतःशी संवाद साधतो. म्हणजे विचार करतो. त्यावर मोठ्याने बोला. काहीवेळा हा वेडेपणा वाटू शकतो पण त्यामुळे विचार कमी होतील व प्रश्नही सुटण्यास मदत होईल.

विचारांकडे योग्यपणे लक्ष द्या

डोक्यातले विचार जावे म्हणून आपण त्याकडे दूर्लक्ष करतो. पण आता आपण त्याच्याकडे नीट लक्ष द्यावे. म्हणजे एकच विचार सतत येत राहणार नाही. आपले म्हणने आनणच नीट ऐकले तर तो विचार डोक्यातून निघून जाईल. ५-१० मीनिटे डोळे मिटून मनात सतत येणाऱ्या विचारांकडे लक्ष द्या.

हेही वाचा: Health Tips: वजन कमी करण्यासाठी अ‍ॅपल साइडर व्हिनेगर घेताय? होऊ शकतात या 5 गंभीर समस्या

वेगवेगळे आवाज काढा

सतत, एकामागे एक विचार येत असतील तर डोक शांत करायला वेगवेगळे आवाज काढा. लहोनमोठ्या विविध प्रकारच्या आवाजांमध्ये तुमच्या विचारांमध्ये खंड आणण्याची ताकद असते, त्यामुळे आवाज काढून बघा.

ध्यान किंवा योग करा

योग आणि ध्यानधारणा हा अनेक प्रश्नांवरील उत्तम उपाय आहे. ध्यानाने मन एकाग्र बोण्यास मदत होते. विचार येतात आणि निघून जातात. त्यांचा नीचरा होतो. आपोआपच डोके शांत होते. त्यामुळे रोजच्या रोज योग व ध्यान करावे.

हेही वाचा: Health: उत्तम आरोग्य आणि उत्तम चव देणारे नाचणीचे लाडू कसे तयार करायचे?

Web Title: Are You Nonstop Thinker Having Headache Problem Do These 4 Solutions

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..