Deepika Padukoneला झालेला हार्ट अरिथमिया आजार नेमका काय? | Heart Arrhythmia | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

deepika padukone

Deepika Padukoneला झालेला हार्ट अरिथमिया आजार नेमका काय?

बॉलिवूडची मस्तानी गर्ल दीपिका पदुकोण नेहमी तिच्या चित्रपटावरुन चर्चेत असते पण सध्या तिच्या तबियतीवरुन ती चर्चेत आली आहे. नुकत्यात एका रिपोर्टवरुन सोमवारी दीपिकाला मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं त्यानंतर तिच्या वेगवेगळ्या टेस्ट करण्यात आल्या. सध्या तिच्या हेल्थविषयी कोणतीही अधिकृत अपडेट समोर आलेली नाही. (Deepika Padukone latest Update)

काही महिन्यांपुर्वीही अभिनेता प्रभाससोबत हैद्राबादमध्ये एका चित्रपटाचं शुटींग करताना दीपिकाचा हार्ट रेट अचानक वाढला होता, तेव्हापण तिला रुग्णलयात दाखल करण्यात आलं होतं. (Heart Attack)

हेही वाचा: Deepika Padukone : अभिनेत्री दीपिका पदुकोण अजुनही ब्रीच कँडी रुग्णालयात?

तुम्हाला माहिती आहे का दीपिकाला काय झालं? दीपिकाला अचानकपणे अस्वस्थ वाटते तिच्या हृदयाची धडधड वाढते किंवा हृदयाचे ठोके वाढते. या पुर्वीही तिला असं झालं होतं, यालाच हार्ट अरिथमिया म्हणतात. आज आपण याच हार्ट अरिथमिया संदर्भात जाणून घेणार आहोत.

हेही वाचा: Urvashi - Deepika: उर्वशीनं केलं दीपिकाला 'किस', फोटोची चर्चा!

हार्ट अरिथमिया

हृदयाचा ठोका अनियमित होतो त्यालाच अरिथमिया म्हणतात. अरिथमियाचे दोन प्रकार आहेत. टॅकिकार्डिया आणि ब्रॅडकार्डिया. यापैकी टॅकिकार्डियामध्ये हार्ट बीट्स वाढतात तर ब्रॅडकार्डियामध्ये हार्टबीट्स कमी होतात.

हार्ट अरिथमियाची लक्षणे

छाती दुखणे, छातीत वेदना होणे, अस्वस्थ वाटणे, अशक्तपणा येणे, चक्कर येणे,

हेही वाचा: Deepika Padukone Copy: सेम टू सेम! दीपिकाची डुप्लीकेट असण्याचा या मुलीला बसतोय फटका

हार्ट अरिथमिया न होण्यासाठी ही काळजी घ्या

  • धुम्रपान टाळा

  • मद्यपान टाळा

  • ध्यान करा

  • व्यायम करा

  • योग्य संतुलित आहार घ्या

  • सात -आठ तास झोप घ्या