Holi Festival | होळीचे रंग ठरू शकतात जीवघेणे; श्वसन विकारापासून सावध राहा causes and symptoms of Chronic obstructive pulmonary disease holi festival colours causes COPD | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ritesh deshmukh and jenelia Holi Festival

Holi Festival : होळीचे रंग ठरू शकतात जीवघेणे; श्वसन विकारापासून सावध राहा

मुंबई : होळीच्या रंगांमुळे केवळ त्वचेची किंवा डोळ्यांची अॅलर्जीच नाही तर श्वसनाच्या समस्याही उद्भवतात. होळीच्या रंगांमध्ये धातू, काचेचे तुकडे, रसायने आणि कीटकनाशके असतात जी क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज (सीओपीडी) वाढवण्यास जबाबदार असतात.

होळी खेळताना नैसर्गिक रंग वापरणे योग्य आहे. यावेळी कोणतेही डिटर्जंट किंवा रसायनयुक्त उत्पादने वापरू नका जे तुमची त्वचा आणि आरोग्यास घातक ठरतील. (Chronic obstructive pulmonary disease )

होळीचे रंग अनेकदा क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीजला (सीओपीडी) कारणीभूत ठरतात. रंगांमध्ये पारा, सिलिका, शिसे, काच आणि कीटकनाशके किंवा डिटर्जंट्स यांसारख्या घातक रसायनांचा समावेश असतो. ही रसायने त्वचा, डोळे आणि फुप्फुसासाठी विषारी ठरतात.

हे रंग तोंडावाटे शरीरात प्रवेश करू शकतात आणि दमा, ब्राँकायटिस आणि क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज (सीओपीडी) सारखी परिस्थिती उद्भवू शकते. हा एक दाहक रोग आहे ज्यामुळे फुप्फुसातून हवेच्या प्रवाहात अडथळा येतो.

श्वास घेण्यास असमर्थता, खोकला, श्लेष्मा (थुंकी) तयार होणे आणि छातीत घरघर होणे ही या रोगाची लक्षणे असल्याचे झायनोव्हा शाल्बी हॉस्पिटल्सचे पल्मोनोलॉजिस्ट डॉ. चेतन जैन यांनी सांगितले.

डॉ. चेतन पुढे सांगतात की, तुम्हाला आधीच श्वासोच्छवासाची कोणतीही समस्या असल्याचे माहीत असल्यास रंगांपासून दूर राहाणे योग्य राहील. रंग लावताना सावधगिरी बाळगली पाहिजे.

चेहऱ्यावर रंग लावणे शक्यतो टाळाच कारण असे करणे धोकादायक ठरु शकते आणि अनेकदा हा रंग तोंडात जाऊ शकतो. जर तुम्ही होळी खेळत असाल तर चेहऱ्यावर मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन लावा जेणेकरून रंग सहज निघून जाईल.भा

होळीचे रंग तुमच्या फुफ्फुसावर दुष्परिणाम करू शकतात. अस्वस्थ करणारी श्वसन समस्या निर्माण करू शकतात. जर तुम्ही होळी खेळत असाल तर ती सुरक्षित पद्धतीने खेळा जेणेकरून तुम्हाला त्याचा आनंद घेता येईल आणि रंग वापरण्यासाठी देखील सुरक्षित असतील.

हे केमिकलयुक्त रंग सीओपीडी आणि इतर श्वसन समस्यांचा धोका वाढवतात. होळी खेळताना काळजी घ्या. प्रौढांप्रमाणेच लहान मुलांनीही सावधगिरी बाळगून केवळ नैसर्गिक रंगांनी होळी खेळली पाहिजे.

अनेकदा कोरड्या रंगांच्या इनहेलेशनमुळे देखील दमा/सीओपीडीची तीव्रता वाढू शकते. कलर इनहेलेशन टाळण्याचा प्रयत्न करा कारण त्यामुळे खोकला किंवा श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो असे डॉ अनिकेत मुळे, इंटरनल मेडिसिन एक्स्पर्ट, वोक्हार्ट हॉस्पिटल, मीरा रोड यांनी स्पष्ट केले.

होळी हा सर्वात आवडत्या सणांपैकी एक आहे ज्यामध्ये लोक एकत्र येऊन तो साजरा करतात. होळीच्या रंगांच्या वापराशी संबंधित काही आरोग्य समस्या आहेत ज्यामुळे एखाद्याला आरोग्य समस्यांचा सामना करावा लागतो.

रंगांमुळे नाक वाहाणे, शिंका येणे, नाक चोंदणे आणि न्यूमोनिटिस देखील होतो ज्यामुळे छातीत रक्तसंचय, श्वास घेण्यात अडचण आणि थकवा येतो. नैसर्गिक रंग वापरून होळी खेळतानाही सुरक्षितता बाळगणे योग्य राहील.

जर चुकून एखादा रंग तुमच्या तोंडावाटे शरीरात गेल्यास तज्ञाचा सल्ला घ्या असेही डॉ तन्वी भट्ट, पल्मोनोलॉजिस्ट, एसआरव्ही हॉस्पिटल, चेंबूर, यांनी सांगितले.

टॅग्स :Holi