देशातील कोरोनाचा आलेख वाढताच, गेल्या 24 तासांत तब्बल 12 हजार नवे रुग्ण |Corona Patient Updates in India | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Patient Updates in India

देशातील कोरोनाचा आलेख वाढताच, गेल्या 24 तासांत तब्बल 12 हजार नवे रुग्ण

देशात दिवसेंदिवस कोरोनाचा आलेख वाढत आहे. देशात रुग्णसंख्येतली वाढ ही कायम आहे. आज देशात १२,२१३ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत तर ७,४२४ रुग्ण आज कोरोनातून बरे झाले आहेत. वाढत्या रुग्णसंख्येने चिंतेचे वातावरण आहे. (corona update india reports 12 thousand new cases check here details)

हेही वाचा: तुम्हालाही आहे का उभं राहून खाण्याची सवय ? होतील असे परिणाम...

देशात गेल्या काही दिवसांपासून सतत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे प्रशासनानेही पुन्हा अलर्ट होत आरोग्य यंत्रणेला सज्ज राहण्याच्या सूचना केल्या आहेत. तर आरोग्यमंत्र्यांकडूनही लोकांना मास्क वापरण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे. सध्या देशात ५८,२१५ अॅक्टीव्ह रुग्ण आहे तर डेली पॉझिटिव्ह रेट २.३५ टक्के आहे.

हेही वाचा: मंकीपॉक्सचे नाव का बदलले जात आहे ?  

लसीकरण

आतापर्यंत देशात कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या 4,32,45,517 वर पोहोचली आहे, तर एकूण बरे झालेल्यांची संख्या 4,26,67,088 आहे. कोरोनामुळे एकूण मृत्यूंची संख्या 5,24,792 वर पोहोचली आहे. यात देशात लसीकरणही वेगाने सुरू आहे. आतापर्यंत एकूण 1,95,50,87,271 लसीकरण करण्यात आले आहे. लसीकरणामुळे कोरोना रुग्णसंख्येत कमालीची घट दिसून आली होती. त्यामुळे सध्या लसीकरणाकडे सर्वांचा जोर दिसून येत आहे.

हेही वाचा: देशातील कोरोनाचा आलेख वाढताच, गेल्या 24 तासांत तब्बल 12 हजार नवे रुग्ण

राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढली

महाराष्ट्रात राज्यात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ होत आहे. मंगळवारी राज्यात जवळपास ३००० रुग्ण आढळून आले आहेत. तर यातील जवळपास १७०० रुग्ण हे मुंबईतील होते. त्यामुळे मुंबईसारख्या शहरात कोरोना पुन्हा डोके वर काढतो की काय? असा प्रश्न निर्माण होतोय. यामुळे मुंबईकरांनी विशेष काळजी आणि खबरदारी घेणे गरजेचे आहे.

Web Title: Corona Update India Reports 12 Thousand New Cases Check Here Details

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top