
Scientific Reason Behind Déjà vu : आपल्या पैकी अनेकांनी हा अनुभव घेतलेला असेलच की, जे काही या क्षणी घडत आहे ते या पूर्वीही घडून गेलं आहे. अगदी असंच्या असं, सेम टू सेम. हे बऱ्याचदा काही लोकांच्या बाबत, काही जागा, ठीकाणांच्या बाबत आपल्याला वाटतं. त्याला देजा वू म्हणतात हे सुद्धा बऱ्याच जणांना माहित असेलच. पण असं का होतं हे माहितीये का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण.
देजा वू विषयी
देजा वू हा फ्रेंच शब्द आहे. याचा अर्थ आहे आधीच बघितलेलं. ही अशी स्थिती आहे जेव्हा आपल्याला वाटतं हा प्रसंग, हा अनुभव आपल्यासोबत आधीच घडलेला आहे. या शब्दाचा पहिल्यांदा वापर 1876 मध्ये झाला. फ्रांसच्या एका फिलॉसॉफरने याचा उल्लेख एका पत्रात केला होता. लाइव्ह सायंसच्या रिपोर्टनुसार 80 टक्के लोकांना हे देजा वू जाणवतं.
या मागचं विज्ञान
दैनिक भास्करच्या वृत्तानुसार, देजा वू का जाणवतं, त्याच्या मागची थेअरी याविषयी न्यूरोसायकायट्रीस्ट डॉ. ओहा सुश्मिता म्हणाल्या, यामागे मेमरी थेअरी असू शकते. सध्याच्या स्थितीशी मिळता जुळता प्रसंग आधीही घडला असावा आणि तो विस्मरणात गेलेला असेल, अशा वेळी देजा वू होत असावा.
सोप्या शब्दात सांगायचं तर सध्याच्या प्रसंगाशी मिळता जुळता प्रसंग भूतकाळात कधी घडलेला असू शकतो. त्यामुळे सध्याची घटना आधी घडली आहे असं आपल्याला वाटतं. या कथित समनातेला समजून घेण्याचा मेंदूचा प्रयत्न म्हणजे देजा वू असावे.
शास्त्रज्ञांनी लॅबमध्ये रिक्रिएट केलं देजा वू
देजा वू फारच स्ट्राँग फिलींग असते. हे माहित होणं फार कठीण आहे की शेवटी ही फिलींग डेव्हलप कशी होते. यासाठी शास्त्रज्ञांनी देजा वू रिक्रिएट करण्यासाठी प्रयोग केला. काही सहभागी बोलवले. शास्त्रज्ञ ऐनी क्लीरी आणि त्यांच्या टीमने व्हर्च्युअल रिअॅलिटीची मदत घेतली. यात सहभागींना देजा वू जाणवण्यासाठी असे काही वातावरण निर्माण करण्यात आले की, जे त्यांच्या अनुभवांशी जोडलेले होते, पण त्यांना नीट आठवत नव्हते. याला गेस्टाल्ट फॅमिलॅरीटी हायपोथिसीस नाव देण्यात आलं.
प्रयोगात काय केलं?
प्रयोगासाठी क्लीरी आणि त्यांच्या टीमने सभासदांना देजा वू ट्रीगर व्हावं यासाठी त्यांच्या अनुभवानुसार एका ठिकाणी फर्नीचर आणि इतर सामान तसंच ठेवलं जसं त्यांनी सांगितलं होतं. नंतर सहभागींना त्या ठिकाणी नेण्यात आलं. हे बघितल्यावर सहभागींना देजा वू झाल्यासारखं वाटलं. याचाच अर्थ जेव्हा कोणती व्यक्ती भूतकाळाशी निगडीत गोष्टींना बघतो पण त्यांना नीट आठवू शकत नाही, तेव्हा त्यांना देजा वूची फिलींग येते.
स्प्लिट परसेप्शन - देजा वू शी निगडीत अजून एक थेअरी
देजा वूची फिलींग परसेप्चुअल गॅप किंवा स्प्लिट परसेप्शनमुळेही होऊ शकतो. हे तेव्हा होतं जेव्हा आपला मेंदू एकाचवेळी एकाच प्रकारच्या सिग्नलला दोन वेळा प्रोसेस करतो. पहिल्यांदा आपलं काँशियस माइंड त्यावर लक्ष देऊ शकत नाही. त्याच्या लगेच नंतर दुसऱ्यांदा जेव्हा सिग्नल मिळतो तेव्हा ही देजा वू ची फिलींग येते, कारण आधीचा सिग्नल आपल्याला आठवत नसतो.
सगळ्यात प्रसिद्ध आणि इंटरेस्टींग - मॅट्रिक्स थेअरी
देजा वू त्या अनेक थेअरीज पैकी सगळ्यात प्रसिद्ध आणि इंटरेस्टींग मॅट्रिक्स थेअरी आहे. लोक बऱ्याचदा याला ग्लिच इन द मॅट्रिक्स थेअरी म्हणतात. याला सिम्युलेशन म्हणू शकतो. काही तज्ज्ञांचं मानणं आहे की, आपण असली ब्रह्मांडात जगत नाही. आपण कम्प्युटरशी जोडलेल्या ब्रह्मांडात राहतो. हे जग, पाणी, झाडे, समुद्र, जीव सगळं काही कम्प्युटर प्रोग्राम आहे. जेव्हा प्रोग्राम ग्लिच होतो म्हणजे काही खराबी येते तेव्हा तो आपल्यावा देजा वू ची फिलींग देतो.
देजा वू कोणत्याही आजाराचा संकेत नाही
न्यूरोसायकायट्रीस्ट डॉ. ओहा सुश्मिता यांनी सांगितलं की, देजा वू ची भावना फार सामान्य आहे. ही कोणत्याही मानसिक आजाराचे संकेत नाही. काही लोकांना स्ट्रेसमुळे हे फार लवकर लवकर जाणवतं, ज्यामुळे मायग्रेन किंवा एन्झायटी होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.