Diabetes Tes : मधुमेह आहे म्हणून शुगरफ्री चहा पिताय? वेळीच थांबा, मधुमेहींसाठी ही सवय ठरेल जीवघेणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Diabetes Tea

Diabetes Tea : मधुमेह आहे म्हणून शुगरफ्री चहा पिताय? वेळीच थांबा, मधुमेहींसाठी ही सवय ठरेल जीवघेणी

Diabetes Tea : चहाने बहुतेकांची सकाळ होते. संपूर्ण भारतात चहाप्रेमींची संख्या बरीच आहे. मधुमेहाचे रूग्ण सुद्धा चहा प्रेमी असतात. मात्र शुगर लेव्हल वाढू नये म्हणून हे रूग्ण शुगर फ्री चहा पितात. आता विना साखरेचा चहा प्यायल्याने काय परिणाम होऊ शकतो बरं, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. आज आपण त्याबाबतच सविस्तर जाणून घेऊया.

मधुमेह असणाऱ्या रूग्णांची ही सवय ठरू शकते जीवघेणी

चहामध्ये असलेले पॉलीफेनॉल आणि टॅनिन हे असे घटक आहेत जे शरीरात लोह पूर्णपणे शोषू देत नाहीत. तसेच लोह शोषण्याच्या प्रक्रियेत व्यत्यय आणतात. जर लोक जेवणानंतर लगेच चहाचे सेवन करतात, तर त्यांना लोह शोषण्यास खूप त्रास होतो, तसेच त्यात आढळणारे कॅफिन हिमोग्लोबिन कमी करते.

जास्त चहा पिणे ठरते हानिकारक

कसेही हवामान असले तरू जास्त प्रमाणात चहा पिणे शरीरासाठी हानिकारक ठरते. तेव्हा चहामध्ये साखर असो किंवा चहा शुगरफ्री असो चहाचे अतिसेवन मधुमेहाच्या रूग्णांसाठी धोक्याचे ठरते.

मधुमेहींसाठी दूध ठरते फायदेशीर

कॅनडा युनिव्हर्सिटी ऑफ ग्वेल्फ आणि युनिव्हर्सिटी ऑफ टोरंटोच्या एका अभ्यासानुसार नाश्त्यामध्ये चांगल्या प्रतीच्या प्रोटीनयुक्त दूधाचा समावेश केल्याने मधुमेहींना फायदा होऊ शकतो. या प्रकाशित अहवालानुसार, नाश्त्यामध्ये बदल केल्याने टाईप 2 डाएबिटीजचा त्रासही आटोक्यात ठेवला जाऊ शकतो.

हेही वाचा: Diabetes Patient : डायबिटीज असणाऱ्यांनी चुकूनही करू नये Smoking; नाहीतर...

दूधाचा फायदा

नाश्त्यामध्ये दूधाचा समावेश केल्याने रक्तातील ग्लुकोज नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. दूधाच्या सेवनाने मधुमेहींना फायदा होतो. यामुळे कार्बोहायड्रेटचं पचन हळूहळू होण्यास मदत होते. परिणामी रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते.

(डिस्क्लेमर - वरील लेख माहितीवर आधारीत असून सकाळ समुह याची पुष्टी करत नाही.)