Garlic Honey Health Tips : रक्तदाबावर गुणकारी आहे लसूण-मध; जाणून घ्या फायदे एका क्लिकवर

लसूण आणि मधाचे अनेक घरगुती उपाय
Garlic Honey Health tips
Garlic Honey Health tipsesakal

Garlic and honey for blood pressure : सामान्य कुटूंबात घरात कोणी आजारी पडले की आधी घरगूती उपचार केले जातात. तरीही आजार कमी नाही झाला तर मग दवाखाण्यात जातात. घरगूती उपचार हे केवळ किरकोळ सर्दी खोकल्यावर केले जातात अशी चुकीची समजूत आहे. पण, खरंतरं घरात केलेल्या काही उपायांनी मोठ-मोठ्या आजारावर नियंत्रण मिळवता येते.

Garlic Honey Health tips
Garlic Health Tips : काय सांगताय? लसणाचे एवढे प्रकार आहेत?

लसूण आणि मधाचे अनेक घरगुती उपाय आहेत. आहार तज्ञ आणि डॉक्टर मध आणि लसणाचे अनेक अद्भुत फायदे सांगतात. खाण्यासाठी असो वा कोणत्याही सौंदर्य टिप्स, रोग किंवा कोणतीही किरकोळ दुखापत यावर लसूण गुणकारी आहे. लसूण आणि मध हे रोजच्या आहारात भाग बनवता येतात. चला जाणून घेऊया मध आणि लसणाचे आरोग्य लाभ.

Garlic Honey Health tips
Winter Health Tips: चहा शिवाय हे तीन पेय देऊ शकतात तुम्हाला सर्दी खोकलापासून मुक्ती

हृदयासाठी वरदान

लसूण शरीरातील उच्च रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतो. त्यामूळे हृदयाशी संबंधित आजार कमी होतात. यासोबतच शरीरात रक्ताचा पुरवठा सुरळीत ठेवण्यास मदत होते. त्यामुळे रक्त घट्ट होत नाही. मधामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स हृदयविकारांपासून तूम्हाला दूर ठेवण्यास मदत करतात.

Garlic Honey Health tips
Pregnancy Health Tips : गर्भावस्थेत ग्रीन-टी घेतल्याने होते का वेळेआधी प्रसुती? जाणून घ्या तोटे

मेंदूही निरोगी

अल्झायमर रोगापासून संरक्षण करण्यासाठी मध आणि लसणाचे सेवन करणे फायद्याचे ठरते. भ्रमनिरास किंवा वेडेपणासारख्या गंभीर आजारावरही हे घटक गुणकारी आहेत. त्यात असलेले अँटिऑक्सिडंट्स आणि इतर पोषक घटक स्मरणशक्ती, एकाग्रता वाढवण्यास मदत करतात. वाढत्या वयाबरोबर कमी होत जाणारी मानसिक क्षमता देखील त्यांच्या सेवनाने दुरुस्त केली जाऊ शकते.

Garlic Honey Health tips
Health Tips : हिवाळ्यात मूळा खा; अन् असाध्य आजारावर मिळवा नियंत्रण

एँटीबॅक्टीरियल घटक

अशा संक्रमणातून पसरणाऱ्या आजारावर लसूण आणि मध गुणकारी आहे. न्यूमोनिया सारखा गंभीर आजारही मध आणि लसूण आपल्यापासून दूर ठेवतात. या पदार्थांचे मिश्रणाच्या सेवनाने बॅक्टेरियाची वाढ थांबते. हवेतून होणारे संक्रमण आपल्यासाठी जीवघेणे ठरू शकते.

Garlic Honey Health tips
Health Tips: मुड बुस्टअप करण्यासाठी ट्राय करा 'या' सिंपल टिप्स

व्हायरलपासून संरक्षण

वातावरणातील बदलामूळे होणारा सर्दी-खोकला बरा करण्यासाठी मधाचा वापर केला जातो. काही दुर्मिळ व्हायरल इफ्केशनवर मध रामबाण उपाय ठरतो.

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com