Mobile Usage ब्रेन ट्युमरचा धोका वाढतोय का? जाणून घ्या काय आहे सत्य

मेंदूशी संबंधित आजारांमध्ये सर्वात जास्त चर्चा होते ती म्हणजे ब्रेन ट्यूमरची. ब्रेन ट्युमर हा एक गंभीर आजार असला तरी यावर उपचार उपलब्ध आहेत. मात्र अनेकदा सामान्यांमध्ये या आजाराविषयी अनेक गैरसमज असल्याचं दिसून येतं
ब्रेन ट्युमरबाबत समज-गैरसमज
ब्रेन ट्युमरबाबत समज-गैरसमजEsakal

मेंदू हा आपल्या शरीरातील सर्वात महत्वाचा अवयव आहे. मेंदूमुळे Brain शरीराचं कार्य सुरळीत चालतं. कोणतीही क्रिया करण्यासाठी शरीराला मेंदूकडूनच सूचना मिळत असतात. मेंदूच्या सुचनांनुसार आपलं शरीर किंवा अवयव कार्य करतात. Health Tips Marathi Know the myths about brain Tumor

एवढचं नव्हे तर भूक लागणं, झोप येणं अशा क्रिया देखील मेंदू कंट्रोल करत असतो. तसंच रडू येणं, आनंद होणं, राग येणं अशा विविध भावनांचे Emotions संकेत देखील मेंदूकडून मिळत असतात. यासाठीच मेंदूचं आरोग्य Brain Health जपण्यासाठी आपण कायमच प्रयत्नशील असतो.

मेंदूचं आरोग्य बिघडल्यास मानसिक ताण तसचं मानसिक संतुलन बिघडण्यासोबत Mental Health Problems इतरही गंभीर समस्या निर्माण होवू शकतात.

मेंदूशी संबंधित आजारांमध्ये सर्वात जास्त चर्चा होते ती म्हणजे ब्रेन ट्यूमरची Brain Tumor. ब्रेन ट्युमर हा एक गंभीर आजार असला तरी यावर उपचार उपलब्ध आहेत. मात्र अनेकदा सामान्यांमध्ये या आजाराविषयी अनेक गैरसमज असल्याचं दिसून येतं. या गैरसमजांमुळे काहीवेळीस उपचारांमध्ये बाधा निर्माण होवू शकते. यासाठीच ब्रेन ट्यूमरबद्दलचे गैरसमज दूर होणं गरजेचं आहे.

मोबाईलमुळे ब्रेन ट्यूमरचं प्रमाण वाढतंय?

मोबाईल फोनच्या अतिवापरामुळे गेल्या काही वर्षात अनेक आजारांचं प्रमाण वाढताना दिसतंय. खास करून स्मार्टफोन आणि सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे मानसिक आरोग्य धोक्यात येतंय. तसंच मोबाईल फोनच्या रेडिएशनमुळे आरोग्यावर नकारात्मक परिणाम होत असला तरी यामुळे ब्रेन ट्यूमर होत नाही.

तसंच मोबाईलच्या अति वापरामुळे ब्रेन ट्यूमर होतो हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेलं नाही, असं नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युटनं स्पष्ट केलंय.

हे देखिल वाचा-

ब्रेन ट्युमरबाबत समज-गैरसमज
Brain Health Tips: तुमच्या या सवयी मेंदू करतात बाद; वेळीच स्वत:ला आवर घाला, नाहीतर...

आई-वडीलांना ब्रेन ट्यूमर असल्यास मुलांनाही धोका?

मधुमेह किंवा इतर आनुवांशिक आजारांप्रमाणेच ब्रेन ट्यूमरचा देखील आनुवांशिक धोका असल्याचं अनेकदा बोललं जातं. मात्र ब्रेन ट्यूमर आनुवांशिक असल्याचं अद्याप वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेलं नाही. जीवनशैलीशी निगडीत किंवा पर्यावरणीय कारणांमुळे ब्रेन ट्यूमरचा धोका वाढतो. आई- वडिलांना ब्रेन ट्यूमर असल्यास मुलांनाही होवू शकतो हा एक गैरसमज आहे.

६० वर्षांवरील व्यक्तींनाच होतो ब्रेन ट्यूमर?

ब्रेन ट्यूमर हा केवळ वयस्क लोकांनाच होतो हा एक मोठा गैरसमज आहे. ब्रेन ट्यूमर हा अगदी लहान मुलांपासून तरुण आणि वयोवृद्ध अशा कोणत्याही वयोगटातील व्यक्तींना होवू शकतो. एका सर्वेक्षणानुसार निदान झालेल्या ब्रेन ट्यूमरच्या प्रकरणांमध्ये ३.९ टक्के प्रमाण हे ० ते १४ वर्ष वयोगटातील मुलांचं आहे.

एकंदर कोणत्याही वयोगटातील व्यक्तींना ब्रेन ट्यूमरचा धोका असतो. यासाठी ब्रेन ट्यूमरची लक्षण जाणून घेऊन योग्य काळजी घेणं गरजेचं आहे.

ब्रेन ट्यूमरची लक्षणं

ब्रेन ट्यूमरची लक्षणं ही ब्रेन ट्यूमरचा साइज आणि तो कोणत्या ठिकाणी आहे यानुसार वेगवेगळी असू शकतात. ब्रेन ट्यूमरची सामान्य लक्षणं पुढील प्रमाणे आहेत.

सततची डोकेदुखी किंवा एकाच ठिकाणी डोकं दुखणं

कायम मळमळ जाणवणं

एका हातात किंवा पायामध्ये मुंगा येणं किंवा कार्य न करणं

अस्पष्ट दिसणं

बोलण्यामध्ये अडचण निर्माण होणं तसचं स्मरणशक्ती कमी होणं

शरीराचं संतुलन बिघडणं

ही ब्रेन ट्यूमरची काही सामान्य लक्षण आहेत.

हे देखिल वाचा-

ब्रेन ट्युमरबाबत समज-गैरसमज
Brain Hemorrhage : मेंदूची रक्तवाहिनी अचानक फुटते का?, आधी काही लक्षणं दिसतात?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com