Walk Benefits : सायलेंट वॉक म्हणजे काय माहितीये? तुमच्या आरोग्यास मिळतील अद्भुत फायदे

सायलेंट वॉक म्हणजे काय? यामुळे शारीरिक व मानसिक आरोग्यास कोणकोणते फायदे मिळू शकतात.
silent walk health benefits
silent walk health benefitssakal

Health Tips फिट राहण्यासाठी कित्येक जण वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम करतात. प्रत्येक जण स्वतःच्या कम्फर्ट व आवडीनुसार व्यायामाची निवड करतात. काही जणांना मॉर्निंग वॉक करायला आवडते. पण काही लोक मोबाइलवर गाणी ऐकत, रिल्स पाहत किंवा ऑफिसचे काम करत वॉक करतात. 

लोक आपापल्या जीवनात  इतके व्यस्त झाले आहेत की त्यांना खाण्यापिण्याच्या वेळा पाळणे तर सोडाच पण साधे चालण्याचा व्यायाम करायलाही पुरेसा वेळ नाहीय. पण खरंच तुम्हाला मानसिक शांतता हवीय का?

silent walk health benefits
Health Care News: चटकदार लोणचं चवीने खाताय तर थांबा! या गंभीर आजारांचा करावा लागेल सामना

तर मग वर्कआऊट रूटीनमध्ये सायलेंट वॉक ((Benefits of silent walking) या व्यायामाचा नक्की समावेश करा. सध्या हा व्यायाम प्रकार ट्रेंडमध्ये आहे. जाणून घेऊया सविस्तर माहिती…

silent walk health benefits
Health Care News: वेट लॉस आणि फॅट लॉस यात काय फरक आहे? जाणून घ्या

सायलेंट वॉकिंग म्हणजे नेमके काय ?   

कोणाशीही गप्पा न मारता, कोणत्याही गॅजेट्सचा वापर न करता, मौन धारण करून चालणे म्हणजे सायलेंट वॉकिंग. यावेळेस तुमचे लक्ष केवळ निसर्गावर केंद्रित असणे आवश्यक आहे. ज्यामुळे शारीरिक मानसिक ताण कमी होण्यास मदत मिळू शकते.

जे लोक एकाग्रतेनं सायलेंट वॉक करतात, त्यांना आपण सभोवतालच्या जगाशी जोडले गेलो आहोत, अशी जाणीव होते.  तसंच त्यांच्यातील एकग्रता क्षमता देखील वाढते. 

silent walk health benefits
Visceral fat : पोटाच्या आत जमा झालेले फॅट्स आरोग्यासाठी ठरू शकतात घातक, जाणून घ्या उपाय

सायन्स डेलीच्या माहितीनुसार, कोणतेही गाणे न ऐकता शांतपणे वॉक केल्यास मानसिक ताण कमी होण्यास मदत मिळते. हा प्रकार तुम्हाला कंटाळवाणा वाटत असल्यास रोज नवनवीन ठिकाणी वॉक करावे. यामुळे तुमचा मूड देखील फ्रेश होईल.

सायलेंट वॉक करण्याचे फायदे 

मानसिक आरोग्य सुधारते

आपला मेंदू दिवसभर कोणत्या-न्-कोणत्या कामात व्यस्तच असतो. परिणामी आपला मेंदू थकतो. दिवसभरातील थकवा, ताणतणाव, चिंता यासारख्या समस्या दूर करण्यासाठी मेंदूला शांतता मिळणे आवश्यक आहे. म्हणून सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेस सायलेटं वॉक केल्यास तुमचया मनाला शांतता मिळू शकते.

सकारात्मकता वाढते  

जी मंडळी नेहमीच कोणत्या-न्-कोणत्या कामामध्ये व्यस्त असतात. अशा लोकांना स्वतःसाठी वेळ मिळत नाही. परिणाम या लोकांमध्ये नैराश्य, ताण, चिंता यासारख्या समस्या निर्माण होतात. पण या समस्यांपासून मुक्तता मिळवायची असेल तर सायलेंट वॉकची आपण मदत घेऊ शकता. यामुळे सकारात्मकता देखील वाढण्यास मदत मिळू शकते. 

आळस होतो दूर  

वॉक केल्यानं शारीरिक तसंच मानसिक आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते. यामुळे तुमच्या शरीरातील आळस देखील दूर होण्यास मदत मिळते. कारण सायलेंट वॉक केल्यानं शारीरिक थकवा दूर होतो. 

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com