
पुरुषांनो, या तीन पदार्थांचं सेवन केल्यास वाढेल प्रजनन क्षमता
लग्नानंतर पुरुषांच्या खांद्यावर जबाबदारीचे ओझे वाढते. कुटुंबाची किंवा भविष्याची चिंता सतावू लागते. अनेक वेळा पुरुष शारीरीक आणि मानसिक तणावाचे शिकार होतात.त्यामुळे पुरुषाच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो आणि शरीराची ताकद खूप कमी होऊ लागते. तणावामुळे पुरुषातील हार्मोन्समध्ये दिवसेंदिवस बदल दिसून येतात. या सर्वांचा परिणाम पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर (Fertility) होताना दिसतो.
हेही वाचा: Breakfast घेतल्यानं वजन वाढतं? कोणता आहार फायदेशीर, जाणून घ्या
पुरुषांची ताकद वाढवण्यासाठी योग्य ते आवश्यक आहार घेणे आवश्यक आहे.पुरूषांनी आपल्या आरोग्याची योग्य काळजी घेतली आणि तज्ज्ञांचा सल्ला घेतला तर त्यांच्या शरीरावर सकारात्मक परिणाम दिसून येईल आणि पुरुषांची प्रजनन क्षमता(fertility) वाढणार.
1. कॉफी
असं म्हणतात, कॉफी ही शरीरासाठी हानिकारक असते. आवश्यकतेपेक्षा जास्त कॉफी पिणे आरोग्यासाठी वाईट आहे, कारण त्यात कॅफिनचे प्रमाण खूप जास्त असते. मात्र तुम्हाला माहिती आहे का की कॅफिनमुळे आपल्या नसांमध्ये रक्तप्रवाह चांगला होतो आणि गुप्तांगांच्या मासपेशींनाही आराम मिळतो आणि इरेक्टाइल डिस्फंक्शनची समस्या येत नाही.
हेही वाचा: यांना असतो Vitamin D deficiency चा धोका; हे पदार्थ खायला सुरुवात करा
2. पालक
तुम्हाला नपुंसकता किंवा इरेक्टाइल डिस्फंक्शन ची समस्या भेडसावत असेल तर आतापासून पालक खाणे सुरू करा. हिरव्या पालेभाजीला फोलेटचा चांगला स्रोत मानला जातो, ज्यामुळे ब्लड सर्कुलेशन खूप चांगले होते. फॉलिक अॅसिड हे पुरुषांच्या लैंगिक आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे असते, पालकामध्ये आढळणारे मॅग्नेशियम प्रायव्हेट पार्ट्समध्ये रक्त प्रवाह सुधारते आणि टेस्टोस्टेरॉन हार्मोनची पातळी वाढवते.
3. सफरचंदाची साल
बरेच लोक सफरचंद खाण्यापूर्वी त्याची साल काढून टाकतात पण तुम्हाला माहिती आहे की सफरचंदाची साल खाल्ल्याने पुरुषांचे आरोग्य सुधारते आणि इतर अनेक आजारांपासूनही आराम मिळतो.
Web Title: How To Increase Male Fertility Check Tips Here
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..