Benefits Of Kulhad Tea : हिवाळ्यात कुल्हडमधून चहा प्या; आरोग्यासाठी आहे वरदान

चहा म्हणजे अनेकांसाठी अमृत
Benefits Of Kulhad Tea
Benefits Of Kulhad TeaESAKAL

Benefits Of Kulhad Tea : चहा म्हणजे अनेकांसाठी अमृतच. कामाचा कंटाळा असो वा मित्रांशी गप्पा सोबतीला चहा तर हवाच. घरात तप सकाळी चहा लागतोच.पण, कामाच्या ठिकाणी रिफ्रेश करणारे एनर्जी ड्रिंक म्हणूनही चहाकडे पाहिले जाते.

Benefits Of Kulhad Tea
Amazing Benefits Of Garli: पुरुषांसाठी लसूण करतं सुपरफूडचे काम

चहाच्या टपरीवर ‘एक कटिंग द्या ओ’ असं म्हणत टपरीसमोर उभी राहणारी व्यक्ती रोजंदारीवर काम करणारी असो किंवा थेट एसीची हवा खात कॉर्पोरेटमध्ये काम करणारी सर्वांना चहा हा लागतोच.

Benefits Of Kulhad Tea
Winter Special Tea: थंडीच्या दिवसांत झटपट बनवा विंटर स्पेशल मसाला टी; मूड अन् माइंड होईल फ्रेश

सध्या टपरीवर प्लास्टीकच्या कपातून चहा दिला जातो. काही ठिकाणी काचेच्या तर काही ठिकाणी मातीच्या कपातून. याला कुल्हड असेही म्हणतात. या मातीच्या कपातून चहा घेणे म्हणजे अमृतच ओठांना लावल्याचा अनुभव येतो. कुल्हडचा चहा आपल्या आरोग्याला कोणत्याही प्रकारे हानी पोहोचवत नाही.तर, परंतु या चहामुळे आपल्या आरोग्यालाच फायदा होतो. या कुल्हडचे आपल्या आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. ते जाणून घेऊयात.

Benefits Of Kulhad Tea
Power Nap Benefits : ऑफिसमधील 10 मिनिटांची डुलकी ठरेल आरोग्यदायी

कुल्हड चहामुळे पोटात एसिड तयार होत नाही. चहा प्यायल्यानंतर गॅसची समस्या होत नाही. याशिवाय हा चहा प्यायल्यानंतर तुम्हाला आंबट ढेकर येणे आणि पचनाशी संबंधित समस्यांची काळजी करण्याची गरज नाही.

Benefits Of Kulhad Tea
Tea : जेवणानंतर लगेचच चहाचे सेवन करत असाल तर सावधान ! असे आहेत दुष्परिणाम

लहान मुलं जेव्हा माती खाते तेव्हा त्याला कॅल्शियम कमी पडते असे घरातील वयोवृद्ध लोक म्हणतात. हे खरे आहे. मातीचे भांडे आपल्या शरीराला लागणारे कॅल्शियमची कमतरता भरून काढते.

Benefits Of Kulhad Tea
Alum Benefits : तुरटीचे खास गुण अन् आश्चर्यकारक फायदे माहितीयत? मग, जाणून घ्या

कुल्हड एक इको-फ्रेंडली उत्पादन आहे, ज्यामध्ये चहा प्यायल्याने पोटातील अॅसिडिटीची समस्या दूर होते. अनेकदा आपण दुकानात ज्या प्लास्टिकचे ग्लास किंवा कपमध्ये चहा पितो ते नीट धुतले जात नाहीत, त्यामुळे संसर्गाचा धोका निर्माण होतो. पण कुल्हडमध्ये चहा प्यायल्याने संसर्गाचा धोका टाळू शकता.

Benefits Of Kulhad Tea
Tea: तुम्हालाही चहाचं व्यसन जडलंय? कसं सोडाल, ट्राय करा 'या' ट्रिक्स

अनेकदा आपण दुकानात ज्या ग्लास किंवा कपमध्ये चहा पितो ते नीट धुतले जात नाहीत. त्यामुळे संसर्गाचा धोका निर्माण होतो. पण, मातीचे कप स्वच्छ धुवूनच वापरले जातात. त्यामुळे कोणत्याही चहाच्या टपरीवर कुल्हडमधूनच चहा प्या.

Benefits Of Kulhad Tea
Tea: चहा पिण्याचे तोटे

कागदी कप धोकादायक

संशोधनातून हे सिद्ध झालं आहे, की कागदी कपांमध्ये सुद्धा काही प्रमाणात प्लॅस्टिकचा अंश असतो. कपच्या आतील भागाला प्लॅस्टिकचा एक पातळ थर देण्यात येतो. या थरामध्ये प्लॅस्टिकसह इतरही काही हानिकारक पदार्थांचा समावेश असतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com