

लव्हेंडर हे एक सुंगधित फुलझाड आहे. या वनस्पतीवर लव्हेंडर रंगाची सुरेख आणि सुंगधित फुले येतात. प्राचीन काळापासून लव्हेंडर वनस्पतीपासून काढल्या जाणाऱ्या तेलाचा वापर आरोग्य आणि सौंदर्यासाठी केला जातो ज्याला लव्हेंडर ऑईल असं म्हणतात. या तेलाच्या वापरामुळे तुमचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ उत्तम राहते. लव्हेंडरच्या सुकलेल्या फुलांचा आणि तेलाचा वापर सौंदर्यप्रसाधनात मोठ्या प्रमाणात केला जातो.(Lavender oil benefits)
बाजारात सध्या लव्हेंडर इसेंशिअल ऑईल, लव्हेंडर बाथ जेल, लव्हेंडर स्क्रब, लव्हेंडरची सुकलेली फुलं आणि ताज्या फुलांचा अर्क, लव्हेंडर साबण, लव्हेंडर क्रीम आणि लोशन अशा स्वरूपात ते तुम्हाला उपलब्ध होते. मात्र असं असूनही आजही अनेकांना या औषधी आणि सुगंधित वनस्पतीबद्दल अज्ञान आहे. त्यामुळे आजच्या लेखात आपण बहुगुणी लव्हेंडर तेलाचे फायदे काय काय आहेत याविषयीची सविस्तर माहिती पाहणार आहोत.
आजकाल यामुळे नैराश्याचे प्रमाणही वाढत जाते. नैराश्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आधी ताणतणाव नियंत्रित ठेवणं गरजेचं आहे. तसेच मानसिक ताण कमी करण्यासाठी, शांत झोप लागण्यासाठी आणि शांतता मिळण्यासाठी लव्हेंडर तेल नक्कीच फायदेशीर आहे. यातील औषधी गुणधर्मामुळे तुम्हाला शांतता मिळते आणि शरीराला आराम मिळतो. रात्रीच्या वेळी घरात लव्हेंडर तेलाच्या अरोमाचा वापर करा अथवा हातपायाच्या तळव्यांना लव्हेंडर तेल चोळा. ज्यामुळे तुम्हाला रात्री शांत झोप लागण्यास मदत होईल.
सततची डोकेदुखी, पोटदुखी, पाठदुखी, कंबर दुखी, सांधेदुखी अशा अनेक आजारपणात वेदना असह्य झाल्यामुळे दैनंदिन कामे करणे कठीण होते. पण अशा वेळी लव्हेंडर तेलाच्या मसाजमुळे तुमच्या वेदना कमी होतात. कारण या तेलामध्ये दाह आणि वेदना कमी करणारे गुणधर्म असतात.
जर तुमची पचनशक्ती कमजोर असेल तर त्यामुळे वारंवार पोटात दुखणे, उलटी, जुलाब, बद्धकोष्ठतेचा त्रास होण्याची शक्यता असते. लव्हेंडर तेलामुळे तुमची पचनशक्ती सुधारण्यास मदत होते. यासाठी तुम्ही दिवसातून एकदा लव्हेंडर टी घेऊ शकता.त्वचेवरची अॅलर्जी कमी करण्यासाठी आणि श्वसनामार्ग निरोगी ठेवण्यासाठी या लव्हेंडर तेलाच्या सुंगधाचा वापर होऊ शकतो. काही संशोधनात असं आढळून आलं आहे की लव्हेंडर तेलाचा श्वसनाचे आजार बरे करण्यासाठी चांगला फायदा होतो.
लव्हेंडर तेलामध्ये तुमच्या चिंता, काळजी कमी करण्याची आणि मेंदू आणि शरीराला आराम देण्याची क्षमता असते. लव्हेंडर तेलामुळे तुम्हाला शांत आणि निवांत वाटू लागतं. त्यामुळे मूड स्विंगच्या समस्येवर उपाय करण्यासाठी लव्हेंडर तेल नक्कीच परिणामकारक ठरते. त्वचा निरोगी राहण्यासाठी ती मुळापासून स्वच्छ आणि डिटॉक्स करणं गरजेचं असतं.
कारण दैनंदिन जीवनात त्वचेचा सतत धुळ, माती, प्रदूषण आणि मेकअपमधील हानिकारक केमिकल्ससोबत संपर्क येत असतो. ज्यामुळे त्वचेचे पोअर्स ब्लॉक होतात आणि त्वचेवर याचा वाईट परिणाम होतो. मात्र लव्हेंडर ऑईलमुळे तुमच्या त्वचेच्या मुळाशी असलेले जीवजंतू नष्ट होतात. यातील अॅंटि ऑक्सिडंट घटकांमुळे त्वचा योग्य पद्धतीने डिटॉक्स होतेआजकाल केस गळणे ही अनेकांची समस्या आहे.
सतत केस गळण्यामुळे डोक्यावर टक्कल पडण्याची शक्यता असते. अशा वेळी लव्हेंडर तेल लावण्यामुळे केसांची वाढ होऊन केस गळणे नक्कीच कमी करता येते. लव्हेंडर तेल केसांना लावण्यामुळे तुम्हाला शांत झोप लागते, ताणतणाव कमी होतो आणि स्काल्पमधील रक्ताभिसरण सुधारते. ज्याचा चांगला परिणाम केसांच्या मुळांवर होतो. केसांची मुळे मजबूत होतात आणि केस गळणे कमी होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.