थंड किंवा गरम पदार्थ खाताच दातांमध्ये झिणझिण्या येतात का? Tooth Sensitivity दूर करण्यासाठी करा हे घरगुती उपाय

दातांमध्ये थंड किंवा गरम तसंचआंबट पदार्थांच सेवन करताना सतत झिणझिण्या येत असतील Tooth Sensitivity तर ते दातांच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. मात्र काही घरगुती उपचार करून तुम्ही ही समस्या दूर करू शकता
दातांमधील वेदनांवर उपाय
दातांमधील वेदनांवर उपायEsakal

गरम पदार्थ किंवा थंड पदार्थ खाताच दातांमध्ये झिणझिण्या येत असतील किंवा दातांमध्ये तीव्र वेदना निर्माण होत असतील तर दातांच्या सेन्सिव्हिटीची Sensitivity समस्या निर्माण झाल्याचे हे संकेत आहेत. अनेकजणांना या समस्येमुळे खाण-पिणं Eating देखील मुश्किल होतं. Marathi Health Tips How to take care of tooth sensitivity

दातांशी मुळांशी असलेल्या नलिकांना ट्युबल असं म्हणतात. जेव्हा दात किडतात किंवा दात तुटतात तसंच हिरड्यांमध्ये समस्या निर्माण झाल्यास त्याचा परिणाम या ट्युबलवर होत असतो आणि ट्युबलचं नुकसान होतं.

जेव्हा तुम्ही थंड, गरम, आंबट किंवा गोड असे काही पदार्थ खाता तेव्हा या सर्व गोष्टी या ट्युबलद्वारे हिरड्या आणि मज्जातंतूंच्या ऊतींमध्ये जातात. त्यामुळेच थंड, गरम खाल्ल्यास दातांमध्ये वेदना Tooth Pain निर्माण होतात.

दातांमध्ये थंड किंवा गरम तसंचआंबट पदार्थांच सेवन करताना सतत झिणझिण्या येत असतील Tooth Sensitivity तर ते दातांच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. मात्र काही घरगुती उपचार करून तुम्ही ही समस्या दूर करू शकता.

लवंग तेल

आयुर्वेदामध्ये दातांच्या विविध समस्यांसाठी लवंग Clove किंवा लवंगाच्या तेलाचा वापर केला जातो. लवंगामध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटीइफ्लेमेटरी असे गुण असल्याने दातांमधील बॅक्टेरीया दूर होवून दात किडण्याची समस्या दूर होते. तसचं हिरड्या मजबूत होण्यास मदत होते.

यासाठी जर तुमचे दात संवेदनशील झाले असतील म्हणजेच थंड, गरम, आंबट असे पदार्थ खाताच दातांमध्ये वेदना निर्माण होत असतील तर तुम्ही एखादी लवंग चघळू शकता. तसंच लवंगच्या तेलाने हिरड्यांना मसाज करावा.

तेलाने चूळ भरणं

दातांची सेन्सिव्हिटी दूर करून दात मजबूत होण्यासाठी ऑइल पुलिंग म्हणजेच तेलाच्या गुळण्या हा एक प्रभावी उपाय आहे. यासाठी नारळाच्या तेलाचा वापर फायदेशीर ठरतो. नारळाच्या तेलात असलेल्या अँटीबँक्टेरियल गुणधर्मांमुळे दातांमधील वेदना कमी होण्यास मदत होते.

यासाठी नारळाचं तेल किंवा लवंगाचं तेल २-३ चमचे घेऊन ते २-३ मिनिटांसाठी तोंडामध्ये फिरवा. संपूर्णपणे दाढांच्या कानाकोपऱ्यात तेल पोहचेल याची काळजी घ्या. त्यानंतर तेल थुंकून द्या. कोमट पाण्यात मीठ घालून देखील तुम्ही चूळ भरू शकता.

हे देखिल वाचा-

दातांमधील वेदनांवर उपाय
Wisdom Tooth Pain : अक्कल दाढेचं दुखणं सहन होण्यापलिकडे गेलंय? हा उपाय करेल मदत!

ग्रीन टी

ग्रीन टीमध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स आणि अँटीइफ्लेमेटरी गुणधर्म आढळतात. यामुळे सूज कमी होण्यास आणि वेदना दूर होण्यास मदत होते. दातंमध्ये वेदना निर्माण होत असल्यास ग्रीन टीच्या पाण्याने दिवसातून २ वेळा चूळ भरा. तसंच ग्रीन टीने तुम्ही ब्रश देखील करू शकता. यामुळे दात मजबूत होण्यास मदत होते.

लसणाची पेस्ट

लसणामध्ये आढळणाऱं एलिसिन हे एक अँटीबॅक्टेरियल त्तव आहे. ज्यामुळे दातांमधील इंफेक्शन, कॅव्हिटी तसंच झिणझिण्या येण्याची समस्या दूर होण्यास मदत होते. यासाठी लसणाच्या ४-५ पाकळयाची पेस्ट तयार करा.

लसणाची पेस्ट दातांना लावून त्यानंतर त्यावर टूथब्रथ फिरवा. त्यानंगर कोमट पाण्यात मीठ टाकून चूळ भरा. या उपायामुळे दातांच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते.

मोहरीचं तेल

थंड किंवा गरम पदार्थ खाताना दातांमध्ये वेदना होत असतील किंवा झिणझिण्या निर्माण होत असतील तर या समस्या दूर करण्यासाठी तुम्ही मोहऱीच्या तेलाचा वापर करू शकता. यासाठी मोहरीच्या तेलामध्ये चिमूटभर सैंधव मीठ टाकून या पेस्टने २-३ मिनिटांसाठी दात आणि हिरड्यांना मसाज करा. त्यानंतर कोमट पाण्याने दात स्वच्छ करा.

अशा प्रकारे तुमच्या घरात अगदी सहज उपलब्ध असलेल्या काही वस्तूंचा उपयोग करून तुम्ही दातांमधील वेदना दूर करू शकता.

हे देखिल वाचा-

दातांमधील वेदनांवर उपाय
कधीकाळी डुकराच्या केसापासूनही टूथब्रश बनवले गेले, पण आता...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com