Covid-19: कोविडमध्ये मास्कमुळे काहीच फरक पडला नाही? नव्या रिपोर्टने हादरले लोकं

सर्व्हेनुसार “सार्वजनिक ठिकाणी फेस मास्क वापरल्याने तितकासा फरक पडत नाही.”
Covid-19 and Mask
Covid-19 and Maskesakal

Covid-19 and Mask: कोविड-19 च्या सुरुवातीच्या दिवसांपासूनच आपल्याला सांगण्यात आलं होतं की फेस मास्क, सोशल  डिस्टन्सिंग, सॅनिटायझेशन आणि लसीकरण याद्वारे आपण या विषाणूपासून वाचू शकतो. पूर्ण जगात फेस मास्क अनिवार्य करण्यात आले होते. आता जरी ही महामारी कमी झाली असली तरीही अनेक लोकं आजही मास्क वापरतांना दिसतात. 

Covid-19 and Mask
Covid-19 : कोरोनाचं संकट टळलेलं नाही; WHOने केलं सतर्क

दरम्यान आता अभ्यासातून एक वेगळीच गोष्ट पुढे आली आहे. यूके मधल्या कोक्रेन रिव्ह्यूने केलेल्या सर्व्हेनुसार “सार्वजनिक ठिकाणी फेस मास्क वापरल्याने तितकासा फरक पडत नाही.” त्यांनी फेस मास्क आणि सोशल  डिस्टन्सिंग याने खरंच विषाणू पसरण्याचा वेग कमी होतो का यावर संशोधन केले.

Covid-19 and Mask
Covid Symptoms : कोरोनाची नवी लक्षणं कोणती?; या दुखण्याकडे दुर्लक्ष करू नका!

मास्कवर कोक्रेनचा अहवाल नक्की काय सांगते?

  • कोक्रेनने विश्लेषण केलेल्या मागील ६७ रिपोर्टसमध्ये ११ नवीन रिपोर्टस अॅड झाले आहेत. नवीन स्टडीज, साथीच्या रोगादरम्यान एकूण ६ सर्व्हे विविध देशांत करण्यात आले होते आणि त्यात सुमारे ६११,००० लोकांचा सहभाग होता. 

Covid-19 and Mask
Covid Vaccine : नाकाद्वारे देण्यात येणारी कोविड लस 'यादिवशी' होणार लाँच; दर...
  • हे देखील आढळून आले की हॉस्पिटलमध्ये वापरलेले जाणारे सर्जिकल मास्क आणि N95 मध्ये काहीही फरक नव्हता.

Covid-19 and Mask
Post Covid : पोस्ट कोविड परिणामांसाठी सज्ज राहा; शास्त्रज्ञांचे आवाहन
  • नोव्हेंबर २०२० मध्ये प्रकाशित झालेल्या कोक्रेन रिव्यूच्या आवृत्तीमध्ये कोविड-१९ संशोधन समाविष्ट नव्हते, जे सध्याच्या आवृत्तीत अॅड केले आहे. मागील आवृत्तीने असा निष्कर्ष काढला होता की सर्वांनी मास्क लावणे गरजेचे आहे. 

Covid-19 and Mask
Covid New Travel Advisory : विमानप्रवासापूर्वी ७२ तास आधी RT-PCR टेस्ट अनिवार्य
  • २०२३ च्या आवृत्तीसाठी, त्यांनी फक्त randomized controlled trials (RCTs) ही टेक्निक वापरली होती, ज्यात एका कोणत्यातरी व्यक्तीला टार्गेट न करता पूर्ण एका गटाला टार्गेट करतात. आरसीटी ही निरीक्षण प्रणाली अभ्यासांमध्ये उद्भवू शकणारा पूर्वाग्रह कमी करतात.

Covid-19 and Mask
Covid New Travel Advisory : विमानप्रवासापूर्वी ७२ तास आधी RT-PCR टेस्ट अनिवार्य
  • या रिपोर्टचे ऑथर हे देखील म्हणतात की याचा अर्थ मास्क लावणे सोडून द्यावे असा नाही पण श्वसनामुळे हवेतून पसणाऱ्या जंतूला आणि त्याच्या रोगांना थांबवू शकत नाही. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com