पोटुशी आहात? आयांनो शुद्ध हवेत राहा, अन्यथा बाळावर होईल 'हा' गंभीर परिणाम

Mothers exposure to air pollution impacts baby's birth weight Research
Mothers exposure to air pollution impacts baby's birth weight Research

Air Pollution And Low-Birth-Weight Babies : जगभरामध्ये वाढते प्रदुषणाचा ( Air Pollution) परिणाम आजच्या पिढीवरच नाही, तर येणाऱ्या पिढीवर देखील होणार आहे. या आधी वायू प्रदुषणामुळे गर्भवती महिलांसह त्यांच्या बाळांवर होणाऱ्या परिणामाबाबत अभ्यास झाला आहे. यापूर्वी अमेरिकेच्या सॅन फ्रान्सिस्कोच्या कॅलिफॉर्निया यूनिवर्सिटीद्वारा केलेल्या संशोधनामध्येही असा दावा करण्यात आला होता की, ''2019 मध्ये वायू प्रदुषण आणि त्यातून बाहेर पडणाऱ्या धुरामुळे ६० लाख मुलांचा जन्म निश्चित वेळेच्या आधी होतो.'' (Mothers exposure to air pollution impacts baby's birth weight Research)

Mothers exposure to air pollution impacts baby's birth weight Research
घरी जेवण मागवतायं? Swiggy चा सर्व्हर डाऊन

आता इस्त्राईलच्या द् हिब्रू यूनिवर्सिटी ऑफ जेरूसलमने (The Hebrew University of Jerusalem ) केलेल्या संशोधनादरम्यान केलेल्या अभ्यासातून समोर आले आहे की, ''वायु प्रदुषणामध्ये राहणाऱ्या महिलांच्या मुलांचे वजन जन्माच्यावेळी कमी होते. या मुलांना पुढे जाऊन आरोग्याच्या समस्या निर्माण होतात.'' या अभ्यासामध्ये केलेल्या दाव्यानुसार, ''ज्या गर्भवती महिलांचे (Pregnant women) वजन कमी असते किंवा त्यांची सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमी कमकुवत असेल तर त्यांच्यावर वायूप्रदुषणाचा जास्त परिणाम होतो.''

या अभ्यासाच्या निष्कर्ष एन्वार्यमेंटल रिसर्च जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे.

या संशोधनमध्ये असे ही सांगण्यात आले आहे, वायु प्रदूषणाचा (Air Pollutio) दिर्घकाळ वाईट परिणाम नवजात बाळावर आणि पहिल्या बाळावर जास्त होतो. पण, यासाठी कोणती जैविक प्रणाली(biological system जबाबदार आहे, माहित करणे अवघड आहे.

Mothers exposure to air pollution impacts baby's birth weight Research
'हे फडणवीसांकडून अपेक्षित नव्हतं', अजित पवारांचं अर्थसंकल्पावर उत्तर

काय सांगतात तज्ज्ञ?

हिब्रू यूनिवर्सिटीमध्ये प्रोफेसर हेगई लेवाई (Dr. Hagai Levine) यांचे म्हणणे आहे की, सन २००४ ते २०१५पासून इस्त्राईलमध्ये वायु प्रदुषणाचे कण पीएम २.५ आणि ३ लाख ८० हजार बाळांचा जन्माच्या वेळी कमी वजनाचा घनिष्ठ संबध आहे. म्हणजेच, हवेची गुणवत्ता खराब असेल किंवा प्रदुषणाचे कण असलेल्या या पातळीमध्ये जन्मणारे मुलाचे वजन आणि आरोग्यावर वाईट परिणाम होतो. या संशोधनाचे निष्कर्षानंतर सराकार वायू प्रदुषणामुळे जन्माच्यावेळी कमी वजन असलेल्या मुलांच्या आरोग्यासाठी काय प्रयत्न करू शकते हे पाहणे महत्त्वाचे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com