अल्झायमरच्या उपचारात उपयुक्त ठरू शकते गॅमा एन्ट्रेनमेंट तंत्रज्ञान

Treatment of Alzheimer: अल्झायमरचा सामना करण्यासाठी अल्ट्रासाऊंड-आधारित गामा एंट्रेनमेंट (Gamma Entrainment) उपयुक्त ठरू शकते, हे दाखवण्यात संशोधकांना यश आले आहे.
Treatment of Alzheimer
Treatment of AlzheimerSakal

Treatment of Alzheimer: जगभरातील विकसित देशांमध्ये अल्झायमरच्या रुग्णांची (Alzheimer's patients) संख्या वाढली आहे. अशा परिस्थितीत जगभरातील शास्त्रज्ञ (Scientist) या आजारावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, दक्षिण कोरियातील ग्वांगजू इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी (GIST) च्या शास्त्रज्ञांनी केलेलं संशोधन अल्झायमरच्या उपचारासाठी (Treatment of Alzheimer) उपयुक्त ठरू शकते. ट्रान्सलेशनल न्यूरोडीजनरेशनमध्ये हा अभ्यास प्रकाशित झाला आहे.

अल्झायमरचा सामना करण्यासाठी अल्ट्रासाऊंड-आधारित गामा एंट्रेनमेंट (Gamma Entrainment) उपयुक्त ठरू शकते, हे दाखवण्यात संशोधकांना यश आले आहे. या तंत्रात, एखाद्या व्यक्तीच्या मेंदूच्या लहरी 30 Hz पर्यंत वाढवल्या जातात. या लहरींना गॅमा लहरी म्हणतात. ध्वनी, प्रकाश किंवा यांत्रिक कंपने अशा घटकांच्या उत्तेजनातून नैसर्गिकरित्या हे कार्य केले जाऊ शकते. (New technology gamma entrainment may be helpful in the treatment of Alzheimer's)

Treatment of Alzheimer
मानसिक तणावामुळे होऊ शकतो हार्ट अ‍ॅटॅक किंवा स्ट्रोक - संशोधन

संशोधकांनी उंदरांवर केलेल्या अभ्यासात असे आढळून आले आहे की बी-अ‍ॅमाइलाइड आणि टाऊ प्रोटीन जमा होण्यापासून रोखण्यासाठी गामा एंट्रेनमेंट प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे. संशोधकांनी सांगितले की, 40 हर्ट्झ अल्ट्रासाऊंडच्या मदतीने गॅमा एन्ट्रेनमेंट करता येऊ शकते.

अल्ट्रासाऊंड आधारित नवी पद्धत सोयीस्कर (Ultrasound based new method convenient)-

GIST मधील बायोमेडिकल इंजिनीअरिंगचे सहाय्यक प्राध्यापक जे ग्वान किम यांनी म्हटले आहे की, ''इतर गामा एंट्रेनमेंट पद्धतींच्या तुलनेत अल्ट्रासाऊंड कोणत्याही जखमेशिवाय आणि चेतना प्रणालीला हानी पोहोचवता मेंदूमध्ये प्रवेश करू शकते. यासाठी अल्ट्रासाऊंडवर आधारित ही पद्धत अधिक सोयीस्कर आहे.''

Treatment of Alzheimer
World Alzheimer's Day : चौघांतील एकाला स्मृतिभ्रंश

असा अभ्यास केला -

अभ्यासादरम्यान संशोधकांना असे आढळून आले की उंदरांना दोन आठवड्यांपर्यंत दररोज दोन तास अल्ट्रासाऊंड पल्सच्या संपर्कात आणल्याने मेंदूतील बी-अमायलॉइड थर आणि टाऊ प्रोटीनचे प्रमाण कमी होते. याशिवाय इलेक्ट्रोएन्सेफॅलोग्राफिक विश्लेषणातही त्या उंदरांच्या मेंदूच्या कार्यात सुधारणा झाल्याचे आढळून आले. याचाच अर्थ नसांच्या कनेक्टिव्हीटीला फायदा झाला. इतकेच नाही तर या प्रक्रियेत माइक्रोब्लीडिंग (ब्रेन हॅमरेज) झाले नाही.

अल्झायमरच्या उपचारासाठी नवीन मार्ग उघडले आहेत

जे ग्वान किम म्हणतात की, आमचा अभ्यासामुळे अल्झायमरच्या उपचारासाठी नवा मार्ग खुला करू शकतो . त्याचे कोणतेही दुष्परिणामही होत नाहीत. अल्झायमरशी संबंधित इतर परिस्थितींपासून देखील संरक्षण करू शकते. त्यांनी सांगितले की, रोगाच्या तीव्रतेत वाढ होण्याचा वेग कमी करून रुग्णाचे जीवनमान सुधारता येऊ शकते. त्याच वेळी, पार्किन्सन्ससारख्या अन्य रोगांवर देखील उपचार केले जाऊ शकतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com