Peanut side effects : या रूग्णांनी चुकूनही शेंगदाणे खाऊ नका; तोटे वाचून तुम्हीही म्हणाल 'नको' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Peanut side effects

Peanut side effects : या रूग्णांनी चुकूनही शेंगदाणे खाऊ नका; तोटे वाचून तुम्हीही म्हणाल 'नको'

Peanut side effects : हिवाळ्याच्या दिवसांमध्ये शेंगदाणे अधिक खाल्ले जातात. याला स्वस्त बदाम असेही म्हटले जाते. यात अनेक पोषक तत्व असतात. मात्र काही लोकांसाठी शेंगदाणे खाणे धोक्याचे ठरते. त्यामुळे अनेकांना अॅलर्जी तर अनेकांना पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. तर काही रूग्णांना याने गंभीर समस्या होतील. कोणत्या रूग्णांनी शेंगदाणे अजिबात खाऊ नये ते आपण जाणून घेणार आहोत.

ज्या लोकांना पचनासंबंधीच्या समस्या आहेत किंवा जे हार्ट पेशंट्स किंवा ब्लड प्रेशरचे पेशंट्स आहेत त्यांनी शेंगदाणे खाणे टाळावे.(Heart Attack)

या लोकांनी शेंगदाण्यांच्या दूरच राहावे

  • जर तुमचे वजन जास्त असेल तर तुम्ही शेंगदाणे खाणे टाळावे कारण त्यात जास्त कॅलरीज असतात, ज्यामुळे तुमचे वजन वाढते.

  • ज्या लोकांना अपचनाची समस्या आहे किंवा ज्यांना पोटाच्या समस्या आहेत त्यांनी शेंगदाण्यापासून दूर राहावे कारण त्याने पोट फुगण्याची समस्या सुरू होते.

  • शेंगदाणे जास्त प्रमाणात खाल्ल्यास रक्तदाब आणि हृदयाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात कारण त्यात सोडियमचे प्रमाण जास्त असते. म्हणूनच तुम्ही याचे सेवन कमी प्रमाणातच करावे.

हेही वाचा: Health Care Tips: तुमच्या जेवणात वापरलेला कांदा योग्य आहे ना? जाणून घ्या कांद्याचे प्रकार अन् फायदे

  • शेंगदाणे जास्त खाल्ल्याने किडनीच्या समस्याही वाढू शकतात. कमकुवत यकृत असलेल्या लोकांनी शेंगदाणे खाणे टाळावे. दुसरीकडे, जर त्याचे जास्त सेवन केले तर वजन देखील वेगाने वाढू लागते. अशा स्थितीत त्याचे सेवन करू नये. (Health)

  • शेंगदाणे जास्त खाल्ल्याने त्वचेच्या ऍलर्जीचा त्रासही होतो. अंगावर सूज येणे, लाल पुरळ उठणे, खाज येणे, लालसर होणे यांसारखे दुष्परिणाम तुम्हाला दिसून येतील. जर तुम्हाला ऍलर्जी असेल तर तुम्ही ते खाणे टाळावे किंवा ते खाण्यापूर्वी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

  • (डिस्क्लेमर : येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. ती स्वीकारण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. सकाळ समुह याची पुष्टी करत नाही.)