Adanan Sami : अबब! अदनान सामीचं वजन होतं...,100 किलोहून अधिक वजन असे केले कमी

अदनान सामीने 100 किलोपेक्षा जास्त वजन कमी केले होते
Adani Sami Lose Weight
Adani Sami Lose Weight esakal
Updated on

Weight Loss Tips : गायक, संगीतकार अदनान सामीचा वजन कमी करण्याचा प्रवास खरंच प्रभावी आहे. ज्यांनाही त्यांचे वजन कमी करायचे त्यांनी अदनानचा हा वजन कमी करण्याचा प्रवास जाणून घ्या. त्यांच्यासाठी हा प्रवास एक प्रेरणा आहे. अदनान सामीने 100 किलोपेक्षा जास्त वजन कमी केले होते.

हा प्रवास सोपा नसला तरी वजन कमी करू शकत नाही असा विचार करणाऱ्या सर्वांसाठी हा नक्कीच धडा आहे. तुम्हालाही तुमचे वजन कमी करायचे असेल, तर अदनान सामीच्या वजन कमी करण्याच्या प्रवासातून तुम्ही या 5 गोष्टी जाणून घेऊ शकता.

1. तुम्हाला सातत्य असणे आवश्यक आहे

अदनानचा वजन कमी करण्याचा प्रवास साधा होता. तुम्हाला आश्चर्य वाटत नाही का? पण ते खरे आहे. अदनानने आरोग्याच्या साध्या नियमांचे सातत्याने पालन केले आणि त्याचा परिणाम तुम्हा सर्वांसमोर आहे. जर छोटी चांगली कामे योग्य प्रकारे केली गेली तर त्याचे उत्तम फळ मिळते.

2. केवळ योग्य आहार घेत कमी केले वजन

अदनानच्या वजन कमी करण्याच्या प्रवासाबद्दल अनेक अफवा पसरल्या होत्या.मात्र त्याने सर्व अफवा फेटाळून लावल्या. की फक्त योग्य आहार आणि व्यायामामुळे त्याचे अतिरिक्त वजन कमी झाले.

3. स्वत:साठी कमी करा वजन

दुर्दैवाने लोक वजन कमी करण्याला सौंदर्य आणि आकर्षकतेशी जोडतात आणि त्यामुळे अल्पावधीतच त्यांची आवड कमी होते. अदनान सामीने एका मुलाखतीत खुलासा केला होता की, मी माझे वजन कमी केले कारण मला ते करणे आवश्यक होते. जीवन-मरणाचा प्रश्न होता. पण त्यासाठी काही प्रमाणात शिस्त लागते. हल्ली सगळ्यांचं लक्ष वजन आणि सौंदर्य यांच्यातील स्पर्धेकडे जास्त असते. सौंदर्य हा एक वेगळा विषय असला तरी वजनाकडे नेहमी आरोग्याच्या दृष्टीकोनातून पाहिले पाहिजे.

4. आपल्या आरोग्याबाबत जागरूक रहा

अदनानसाठी, वजन कमी करण्याचा प्रवास सुरू करणे हे त्याच्या लठ्ठपणामुळे त्याला भेडसावणाऱ्या जीवन आणि मृत्यूच्या प्रश्नाचे उत्तर होते. वजन कमी करण्याची शपथ घेण्यापूर्वी त्याचे वजन 230 किलो होते. अदनानने खुलासा केला की तो त्याच्या आहाराबद्दल जागरूक आहे आणि त्याच्या आरोग्यावर परिणाम होईल असे काहीही करत नाही. (Health News)

Adani Sami Lose Weight
Weight Loss Diet : अति खाण्यानेच नव्हे तर थायरॉइडनेही वाढते वजन, असे ठेवा नियंत्रणात

5. योग्य नियोजन करा

काहीतरी साध्य करण्यासाठी आपल्याला नियोजनाची गरज असते आणि अदनानचा वजन कमी करण्याचा प्रवास हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. त्याने एका मुलाखतीत सांगितले होते की मी एक दिनचर्या फॉलो केली ज्यामध्ये मी उच्च-प्रोटीन आहाराचे पालन केले ज्यामध्ये भाकरी नाही, भात नाही, साखर नाही, तेल नाही. मी काही वजन कमी करण्याची अपेक्षा करत होतो पण मी 130 किलो कमी केले. मी विचार केला नव्हता अशी ही गोष्ट होती. आज मी जे खातो त्याबद्दल मी खूप काळजी घेतो. मी जास्त खात नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com