Sleep Disorders : रात्री झोपल्यानंतर वारंवार जाग येते? तुम्हाला होऊ शकतो 'हा' गंभीर आजार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sleep Disorders

Sleep Disorders : रात्री झोपल्यानंतर वारंवार जाग येते? तुम्हाला होऊ शकतो 'हा' गंभीर आजार

झोप ही माणसाची सर्वात प्रिय अशी गोष्ट आहे. काही लोकांना रात्री झोप येत नाही तर काही लोकांनी झोपल्यानंतर रात्री वारंवार जाग येते. आपण याला नेहमी हलक्यात घेतो पण हीच कारणे अनेकदा आपल्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.

रात्री झोपल्यानंतर वारंवार जाग येणं हे चांगलं लक्षण नाही. त्यामागे अनेक कारणे आहेत. आज आपण याविषयीच सविस्तर जाणून घेणार आहोत. (Sleep Disorders News)

हेही वाचा: World Liver Day: फॅटी लिव्हर आजार नेमका काय? जाणून घ्या लक्षणे

रात्री झोपल्यानंतर वारंवार जाग येण्यामागे आपली बदलती लाईफस्टाईल कारणीभूत आहे. रोजच्या जीवनातील अनेक वाईट सवयींमुळे आपल्याला हा त्रास होऊ शकतो. चला तर जाणून घेऊया.

बऱ्याच वेळपर्यंत स्क्रीनसमोर असणे त्यामुळे झोपेचा त्रास होऊ शकतो.  शांत आणि गाढ झोपेसाठी लॅपटॉप, टिव्ही आणि मोबाईल फोन पासून झोपायच्या अर्ध्या तासाआधी दूर जा.

चांगल्या झोपेसाठी चांगली लाइफस्टाइल असणे खूप गरजेचे आहे. वेळेवर जेवण, वेळेवर झोप अत्यंत आवश्यक आहे.

आपण किती झोपतो, हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. लहानंमुलांना 12 ते 14 तासांची झोप किशोर वयातल्यांना 10-12 तास, प्रौढांना 8-10 तास तर 50-60 वर्षे वयोगटातील लोकांना 7-8 तास झोप आवश्यक आहे.

हेही वाचा: Should Drink Water Before Sleep : रात्री झोपण्यापूर्वी पाणी प्यावे का?

रात्री झोपल्यानंतर वारंवार जाग येते? तुम्हाला होऊ शकतो 'हा' गंभीर आजार

रात्री जर तुमची झोप पुरेशी होत नसेल तर तुम्हाला फॅटी लिव्हर आजार होऊ शकतो.  संशोधकांच्या मते रात्री तुम्हाला रात्री वारंवार जाग येत असेल आणि दिवसभर तुम्हाला सतत झोप येत असेल तर तुम्हाला फॅटी लिव्हर रोग होण्याचा सर्वाधिक धोका असतो.

रात्री 1 ते 4 च्या दरम्यान आपण झोपत असताना लिव्हर आपल्या शरीराला स्वच्छ करण्यासाठी आणि डिटॉक्सिफाय करण्याचं काम करतं. जर तुमचं लिव्हरमध्ये फॅट असेल तर डिटॉक्सिफिकेशनसाठी लिव्हरला अधिक एनर्जी लागेल त्यासाठी लिव्हर तुमच्या बॉडीला ट्रिगर करण्याचा प्रयत्न करेल आणि तुम्हाला जाग येणार.