Tea Side Effects : अय्यो, जास्त चहा प्यायल्यानेही पडू शकतं टक्कल, अभ्यासातून आलं समोर

हल्ली केस गळण्याची समस्या ही अत्यंत सामान्य समस्या झाली आहे.
Tea Side Effects
Tea Side Effectsesakal

Over Drinking Of Tea Causes Baldness Shows Study :

हल्लीच्या खाण्या पिण्याच्या सवयी, अन्न सकस नसणे आणि चुकीची जीवनशैली यामुळे केस गळण्याची समस्या फार सामान्य झाली आहे. घरातल्या लहानांपासून ते थोरांपर्यंत प्रत्येक व्यक्तीला केस गळण्याची समस्या असतेच.

एकेकाळी डोक्याला टक्कल पडणे ही फार मोठी समस्या समजली जायची. पण हल्ली वयाच्या २०-३० व्या वयातच कपाळ रुंद झालेले, टक्कल पडलेले आढळते. हार्मोनल चेंज, चुकीचा आहार, मानसिक ताण, अनुवंशिकता याबरोबरच अजूनही काही कारणं आहेत ज्यामुळे कमी वयातच पुरुषांना टक्कल पडण्याची समस्या होत आहे. जाणून घेऊया.

चीनच्या सिंघुआ विद्यापीठाच्या शास्त्रांनी केलेल्या संशोधनातून समोर आले आहे की, चहा, सोडा, कोल्ड्रींक्स आणि इतर गोड पदार्थ अतिरीक्त प्रमाणात पिण्याने पुरुषांमध्ये टक्कल पडू शकते. जे लोक या गोष्टी रोज पितीत त्यांना टक्कल पडण्याचा धोका इतर लोकांच्या तुलनेत ६० टक्क्यांपर्यंत जास्त असतो. लोकांच्या खाण्याच्या सवयींच्या डेटाचा अभ्यास करून हे संशोधन करण्यात आले आहे.

या अभ्यासात सुमारे हजार पुरुषांचा समावेश होता. त्यांच्या आहार थंड पेयआणि चहाचा समावेश होता. त्यांना जास्त गोड चहा पिण्याची सवय होती आणि कोल्ड्रिंक्सही जास्त प्यायचे. यातील बहुत्क पुरुष ५० वर्षांपेक्षा कमी वयाचे होते. साधारणपणे पुरुषांमध्ये टक्कल पडायला वयाच्या ५० वर्षांनंतर सुरुवात होते. पण ज्यांच्या आहारात गोड पेयांचा समावेश जास्त असतो, त्यांच्यात हा धोका १० वर्ष अलिकडेच आल्याचं लक्षात आले. वयाच्या ४० वर्षांच्या आतच टक्कल पडायला सुरुवात झाली. लहान वयातच केस गळायला सुरुवात झाली आहे.

Tea Side Effects
Bed Tea Side Effects: तुम्हालाही बेड टी घेण्याची सवय आहे का? मग, ही बातमी तुमच्यासाठी

या विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी या संशोधनात म्हटले आहे की, गोड प्येय पिणे टाळावे. ज्यांच्या आहारात कोणत्याही स्वरुपात जास्त गोड पेयांचा समावेश होता त्यांना टक्कल पडण्याचा धोका जास्त होता. आठवड्यातूम एक-दोनदा सेवन करण्यात काही अडचण नाही पण जास्त प्रमाणात रोज सेवन करणे घातक ठरू शकते.

आजकाल लोकांना कमी वयात टक्कल पडण्याचा त्रास होत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि मानसिक ताण. जास्त साखर असलेल्या गोष्टींमुळेही टक्कल पडू शकते. असे होते कारण जास्त साखरेमुळे शरीरात इन्सुलिन रेझिस्टन्सची समस्या सुरू होते. यामुळे हार्मोन्सची कमतरता देखील होते. ज्यामुळे टक्कल पडते.

Tea Side Effects
Green Tea Benefits : ‘या’ वेळेस ग्रीन टी प्यायल्यास मिळतील हे 6 जबरदस्त फायदे

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com