Sleep Paralysis : तुमच्यातही जाणवतात का स्लीप पॅरेलिसिसची लक्षणं? वेळीचं व्हा सावध

आपल्यापैकी अनेकंनी पॅरेलिसिस म्हणजे अर्धांगवायूबद्दल वाचले किंवा ऐकले असेल.
Sleep Paralysis
Sleep Paralysis Sakal
Updated on

What is sleep paralysis : आपल्यापैकी अनेकंनी पॅरेलिसिस म्हणजे अर्धांगवायूबद्दल वाचले किंवा ऐकले असेल. परंतु, काही जणांमध्ये स्लीप पॅरेलिसिसदेखील दिसून येतो. स्लीप पॅरेलिसिसमध्ये व्यक्तीचे शरीर काही काळासाठी पॅरेलाइज्ड होते.

हेही वाचा : Shraddha Walker Case: वेबसीरीज ठरतेय का गुन्ह्यांचं गाइडबुक?

Sleep Paralysis
Oil Massage : शरीराला तेलाने मालिश करणे चांगलेच; पण कोणती वेळ योग्य ?

सामान्यतः ही स्थिती एखादी व्यक्ती झोपेत असते किंवा जागी असते ते उद्भवू शकते. या आजारात काही काळासाठी शरीर पॅरेलाइज्ड होते आणि पुन्हा सामन्य स्थिततीत येते. आज आपण हा आजार नेमका काय आणि तो कसा ओळखायचा याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

स्लीप पॅरालिसिस भ्रम आणि चिंता एकत्रितपणे प्रभावी होतात तेव्हा ही परिस्थिती अधिक धोकादायक असते असे तज्ज्ञांचे मत आहे. स्लीप पॅरालिसिस हे साधारणपणे तरुणांमध्ये दिसून येते. एका अभ्यासाता ही समस्या 25 ते 44 वर्षे वयोगटातील स्त्री आणि पुरुषांमध्ये दिसून आली आहे. जगभरात या आजाराने सुमारे 6 % लोकसंख्या त्रस्त आहे.

Sleep Paralysis
Anger Effect On Body: जेव्हा कोणाशी भांडण होतं किंवा राग येतो तेव्हा शरीर का थरथरते?

स्लीप पॅरेलिसिस कोणत्या स्थितीत होतो?

स्लीप पॅरालिसिस हा एकप्रकारे मेंदूचा आजार आहे. ज्यावेळी एखादी व्यक्ती मानसिक दडपणाखाली असते तेव्हाच या आजाराला आमंत्रण दिले जाते. सामान्यतः हा आजार तीन परिस्थितींमध्ये उद्भवतो. सर्वात पहिली स्थिती म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती झोपण्याचा प्रयत्न करते तेव्हा झोपेपूर्वी ही समस्या उद्भवू शकते.

दुसरी परिस्थितीत एखादी व्यक्ती गाढ झोपेत असते आणि ती अचानक जागी होते. तर, तिसर्‍या स्थितीत व्यक्ती जास्त काम करून थकलेल्या अवस्थेत झोपलेली असेल तर, स्लीप पॅरेलिसिरची समस्या घडू शकते.

Sleep Paralysis
Hands Illness Symptoms : आपले हात भविष्यसोबतच गंभीर आजाराबद्दलही देतात संकेत

स्लीप पॅरेलिसिस म्हणजे काय?

स्लीप पॅरेलिसिस होण्याचं मुख्य कारण म्हणजे नकारात्मक विचारांमध्ये बुडून जाणे. नकारात्मक विचारांमुळे आज अनेक जण डिप्रेशनमध्ये जगत आहेत. याचा थेट परिणाम व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावर होतो. या आजाराने ग्रस्त व्यक्ती भीतीच्या वातावरणात जीवन जगू लागतात. कालांतराने ही समस्या स्लीप पॅरालिसिस म्हणून उदयास येते.

स्लीप पॅरेलिसिसची लक्षणं कोणती?

  • बोलता येत नाही आणि शरीर हलवता येत नाही.

  • नकारात्मक ऊर्जा जाणवते.

  • रूममध्ये कोणीतरी असल्यासारखा भास होणे.

  • डोळ्यांसमोर एखाद्या व्यक्तीची सावली असल्याचा भास होणे.

Sleep Paralysis
Winter Season : थंडीत तोंडावर पांघरूण घेऊन झोपल्याने हार्टअ‍ॅकचा धोका, वेळीच व्हा सावध

कसा टाळता येतो स्लीप पॅरेलिसिस

1. नियमित व्यायाम करा.

2. पाठीवर झोपणे टाळा.

3. झोपण्याची पद्धत सुधारा.

4. दररोज पुरेशी झोप घेण्याचा आणि ठरलेल्या वेळीच झोपण्याचा प्रयत्न करा.

5. झोपण्यापूर्वी स्वतःला पूर्णपणे रिलॅक्स करा.

6. कोणतेही औषध घेतल्यानंतर तुम्हाला ही समस्या येत असेल, तर याबाबत त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com