VSG Surgery म्हणजे काय? वजन कमी करण्यासाठी या फोटोग्राफर महिलेने करून घेतली ही सर्जरी

वेटलॉस जर्नीबाबत आणि व्हीएसजी सर्जरीबाबत सविस्तर जाणून घेऊया.
VSG Surgery
VSG Surgeryesakal

VSG Surgery : बरेच लोक हल्ली लठ्ठपणाने त्रस्त आहेत. लठ्ठपणा हा आजार नसला तरी लठ्ठपणा अनेक गंभीर आजारांस कारणीभूत ठरू शकतो. वजन कमी करण्यासाठी कोणी डायटिंग करतं तर कोणी जिममध्ये वर्कआऊट करतं. मात्र एवढी मेहनत करूनही काहींचे वजन काही कमी होत नाही. असेच फोटोग्राफर एथले बिंगसोबतसुद्धा घडले. नंतर त्यांनी सर्जरी करण्याचे ठरवले. चला तर त्यांच्या वेटलॉस जर्नीबाबत आणि व्हीएसजी सर्जरीबाबत सविस्तर जाणून घेऊया.

एथले वजन कमी करण्यासाठी योयो डाएट फॉलो करायच्या

योयो डाएट करूनसुद्धा एथले यांचं वजन कमी झालं नाही. योयो डाएट हा सेलिब्रिटींमध्ये फार चर्चेत आहे. याला वेट सायकलिंग असेही म्हणतात.

VSG Surgery ने कमी झाले एथले बिंग यांचे वजन

अनेक प्रयत्नांनतरही जेव्हा एथलेचं वजन कमी झालं नाही तेव्हा त्यांनी व्हर्टिकल स्लीव ग्रॅस्ट्रेक्टोमी सर्जरी करून घेतली. या सर्जरीने त्यांचा पोटाचा घेर कमी झाला. या सर्जरीने त्यांचे एका वर्षात ४५ किलो वजन कमी झाले. (Lifestyle)

VSG Surgery
Health Tips : झटपट Weight Loss करायचाय? मग मखानाच्या या हेल्दी आणि टेस्टी रेसिपी नक्की ट्राय करा

काय आहे VSG सर्जरी

व्हर्टिकल स्लीव ग्रॅस्ट्रेक्टोमी सर्जरी ही एक प्रकारची बॅरिएट्रिक सर्जरी आहे, जी वजन कमी करण्यास मदत करते. ही सर्जरी असे लोक करतात ज्यांचा बॉडी इंडेक्स म्हणजेच BMI 40 पेक्षा अधिक असतो. या सर्जरीचा प्रमुख उद्देश वजन कमी करणे असतो. VSG सर्जरीच्या मदतीने ८४ ते ११२ किलो पर्यंत बेली फॅट कमी केल्या जाऊ शकते. या सर्जरीमुळे भूक वाढवणारे हार्मोन घ्रेलिनची लेव्हल कमी होते. (Health)

VSG Surgery
Morning drink for weight loss: नारळाच्या पाण्यात हा पदार्थ मिक्स करा, वजन झपाट्याने होईल कमी

VSG सर्जरीचे कार्य

व्हीएसजी सर्जरी वजन कमी करण्यास मदत करू शकते. या सर्जरीदरम्यान, 4-5 लहान चीरे शरीरावर मारले जातात. यामध्ये चीरे करण्यासाठी उपकरणे वापरली जातात. हे चीरे बरे होण्यासाठी २-३ दिवस लागू शकतात. या सर्जरीमुळे पोटाचा आकार कमी होण्यास मदत होते. या शस्त्रक्रियेनंतर भूक कमी होऊ शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com