Diet Tips in Marathi | जे तुम्ही खराब म्हणून टाकून देता ते काळं पडलेलं केळंच आहे आरोग्यदायी what to do with overripe banana which banana is healthy benefits of black banana | Ganana Health Benefits | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ganana Health Benefits Diet Tips in Marathi

Diet Tips : जे तुम्ही खराब म्हणून टाकून देता ते काळं पडलेलं केळंच आहे आरोग्यदायी

Diet Tips in Marathi: केळी अनेक वेळा जास्त पिकतात. अशी काळी पडलेली केळी खराब समजून टाकून दिली जातात.

केळी पिकतात म्हणजे त्यातील साखरेचे प्रमाण वाढते. अशा वेळी केळीच्या सालीवर तपकिरी डाग दिसतात. हे एन्झाइम्समुळे होते. कोऱ्याकरकरीत पिवळ्या केळ्यांपेक्षा काळी पडलेली हिरवी केळी अधिक आरोग्यदायी असतात. (

what to do with overripe banana which banana is healthy benefits of black banana)

हेही वाचा - अदानी..हिंडेनबर्ग आणि भविष्य.... 

छातीत दुखण्याची समस्या

हृदयविकाराच्या झटक्यामुळेच छातीत वेदना होतात असा अनेकांचा गैरसमज असतो. पण हे चुकीचे आहे. छातीत दुखण्याची लक्षणे अनेक कारणांमुळे जाणवतात. पिकलेली केळी खाल्ल्याने छातीत दुखण्यापासून आराम मिळतो.

हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर

जास्त पिकलेली केळी हृदयाच्या आरोग्यासाठी खूप चांगली असते. अशा परिस्थितीत, जर तुमच्या हृदयात वेदना होत असतील, तर तुम्हाला तुमच्या आहारात पिकलेल्या केळ्यांचा समावेश करावा लागेल.

पिकलेल्या केळ्यांमध्ये कोलेस्टेरॉल नियंत्रित करणारे गुणधर्म आहेत ज्यामुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांचा धोका कमी होतो.

वेदनांवर उपाय

जर तुम्हाला देखील स्नायू दुखण्याची समस्या असेल तर तुम्ही पिकलेल्या केळ्याचे सेवन करावे. फेकून देण्याऐवजी त्याचे सेवन करणे हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. पिकलेल्या केळ्यामध्ये पोटॅशियम भरपूर असते, त्यामुळे तुम्ही वेदना कमी करण्यासाठी त्याचा वापर करू शकता.

आजकाल हिरवी केळी बाजारातून गायब झाली आहेत. पण हीच केळी खरंतर आरोग्यासाठी लाभदायक असतात. नैसर्गिकरित्या पिकत असताना त्यांच्यावर एन्झाइम्समुळे काळे डाग पडतात.

सध्या बाजारात हिरव्या केळ्यांऐवजी मोठी पिवळी केळी दिसत आहेत. या केळ्यांवर फारसे काळे डागही नसतात. त्यामुळे स्वच्छ, चांगली केळी म्हणून ग्राहक हीच केळी आधी खरेदी करतात. पण ही केळी इंजेक्शन देऊन पिकवलेली असल्याने आरोग्यासाठी हानिकारक असतात.

तसेच लहान आकाराची पिवळी केळी ज्याला वेलची केळी म्हटले जाते अशी केळीही बाजारात मिळतात. या केळ्यांवरही नैसर्गिकरित्या पिकत असताना काळे डाग पडतात. ही केळीसुद्धा हिरव्या केळ्यांप्रमाणे आरोग्यदायी असल्याचे सांगितले जाते.