मुला-मुलींची वाढ होणे केव्हा थांबते? उंची वाढविण्यासाठी 'हे' उत्तम पर्याय

पौगंडावस्थेतील (Adolescents) मुले शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अनेक बदलांमधून जातात.
When do girls and boys stop growing
When do girls and boys stop growing

बाल्यवस्थेत आणि बालपणी मुली किंवा मुलांची वाढ जलद गतीने होत असते पण त्यानंतर पौंगडावस्थेमध्ये येई पर्यंत ही वाढ स्थिर असते. पौंगडावस्था किंवा तारुण्य हा असा काळ असतो जो बालपण आणि प्रौढ अवस्थेच्यादरम्यान येतो. एखाद्या व्यक्तीमध्ये होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक बदलांमधून तो दिसून येतो. बालपण आणि बाल्यावस्थेमध्ये स्थिर आणि जलद गतीने वाढ झाल्यानंतर, आयुष्याच्या या टप्प्यात मुलांची वाढीला गती येते आणि त्यानंतर त्यांची वाढ थांबू शकते. आहार(Diet), व्यायाम (exercise), जीन्स( genes) आणि रोग (disease) यासारखे घटक वाढीवर, विशेषतः शारीरिक वैशिष्ट्यांवर परिणाम करतात.

When do girls and boys stop growing
When do girls and boys stop growing
When do girls and boys stop growing
पालकांनो, मुलांना झोपेची शिस्त लावा! वाचा अभ्यास काय सांगतो

पौंगडवस्था प्रत्येकासाठी वेगळी असते.

मुलींना येणारी मासिक पाळी आणि मुलांच्या चेहऱ्यावर केसांची वाढ होणे(दाढी-मिशा) ही लक्षणे पौंगडवस्थेमध्ये येण्याची आहे.

या दुय्यम लैंगिक वैशिष्ट्यांच्या विकासानंतरच वाढीचा वेग वाढतो आणि पौंगडवस्थेत तसाच राहतो. संशोधनातून समोर आले आहे की, मुली आणि मुले दोघांमध्ये पौंगडवस्थेचा काळ सहसा २ वर्ष ते ५ वर्षांपर्यंत असतो. काही प्रकरणांणध्ये, काही व्यक्तींसाठी हा काळ बदलू शकतो किंवा दिर्घकाळ टीकू शकतो किंवा लवकर किंवा उशीरा सुरू होऊ शकतो.

अमेरिकन ऍकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्सच्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की, आफ्रिकन-अमेरिकन मुलांमध्ये हिस्पॅनिक किंवा कॉकेशियन मुलांपेक्षा लवकर पौगंडवस्था सुरू होते.

राष्ट्रीय आरोग्य आणि पोषण परीक्षा सर्वेक्षणाद्वारे (National Health and Nutrition Examination Survey) राष्ट्रीय प्रतिनिधी केलेल्या डेटाच्या परिक्षणामध्ये दिसून आले की, 1980 मध्ये जन्मलेल्या महिलांना 1950 च्या दशकात जन्मलेल्या स्त्रियांपेक्षा 0.2-0.4 वर्षे आधी मासिक पाळी आली होती. जरी स्तनाचा विकास सुरू होण्याच्या वयात आणि मासिक पाळीचे वय यांच्यातील परस्परसंबंध अनेक दशकांपूर्वी जास्त होता (0.90 पर्यंत सहसंबंध), पण हा सहसंबंध अधिक अलीकडील गटांमध्ये कमी झाला आहे (0.40 च्या आसपास सहसंबंध),असे दिसते स्तनाचा विकास आणि मासिक पाळीच्या वयात कमी सामायिक तफावत असल्याचे सूचित करते. मासिक पाळी आणि उंचीची वाढ यांच्यातील संबंध देखील अनेक वेळा सांगितला गेला आहे. मासिक पाळीच्यानंतर मुलगी फक्त एक किंवा दोन इंच वाढते, परंतु काही अपवाद दिसून आले आहेत आणि कोणत्याही दाव्याची पुष्टी करण्यासाठी पुरेसा डेटा उपलब्ध नाही.

When do girls and boys stop growing
सतत हेडफोन वापराने श्रवणशक्तीला धोका
When do girls and boys stop growing
When do girls and boys stop growing
When do girls and boys stop growing
'ही' दोन फळं खाल्लाने वाढेल Balley Fat! खाताना विचार करा!

उंची वाढवणे वाटते तितके कठीण नाही

पौगंडवस्थेत मुली आणि मुले या दोघांमध्ये होणारे बदल, विशेषत: त्यांची वाढ आणि उंची, कालावधी आणि परिणाम असे बरेच घटक निर्धारित करतात. मुला-मुलींची उंची वाढवण्याचे काही मार्ग येथे आहेत

व्यायाम (Exercise)

स्ट्रेचिंग, खांबाला लटकणे, काही विशिष्ट योगासणेामुळे उंची वाढण्यास मदत होते. याशिवाय वजन संतुलित ठेवण्यासही मदत होते ज्यामुळे पुढे HGH (Human Growth Hormone) वाढ होण्यास मदत होते. व्यायामामुळे मानसिक आरोग्यामध्येही सुधारणा होते. नियमित व्यायमा हे मुलांच्या वाढीसाठी महत्त्वाचे आहे.

शरीराची ठेवण (Posture)

तुमच्या शरीराची ठेवण ही एखाद्या व्यक्तीच्या उंचीच्या वाढविण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडते. चूकीच्या पध्दतीने शरीराची ठेवण असल्यास एखादी व्यक्ती आहे त्यापेक्षा बुटकी दिसू शकते आणि कालंतराने याचा उंचीच्या वाढीवर देखील परिणाम होऊ शकतो. हे सर्व टाळण्यासाठी उभे राहताना, बसताना आणि झोपताना शरिराची ठेवण चांगली आणि योग्य असली पाहिजे. तुम्हाला जर हे नियंत्रित करता येत नसेल तर तुम्ही डॉक्टरांसोबत संवाद साधू शकतात.

When do girls and boys stop growing
When do girls and boys stop growing
When do girls and boys stop growing
रोज रात्री जेवण करणे टाळताय? आरोग्यावर काय होतो परिणाम? जाणून घ्या

आहार (Diet)

संतुलित आहार हा एखाद्या व्यक्तीची उंचीवर परिणा करणारा महत्त्वाचा घटक असते. अति प्रमाणात कार्बोहायड्रेटस किंवा फॅट्सच्या सेवनामुळे वजन वाढण्यासाठी कारणीभूत आणि उंचीच्या वाढीमध्ये अडथळा ठरू शकतो. प्रथिने, व्हिटॅमिन-डी आणि चांगली चरबीयुक्त पदार्थ वाढीस आणि विकासास प्रोत्साहन देतात. तुमच्या आहारात दूध, ताज्या भाज्या आणि संपूर्ण धान्य यांचा समावेश केल्यास शरीराची दुरुस्तीसाठी होण्यास मदत होते. पोषणाच्या दृष्टीने तुमचा आहार समृद्ध असल्याची खात्री करा आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये साखर, ट्रान्स-फॅट आणि सॅच्युरेटेड फॅट्स यांचे सेवन टाळा.

योगा

उंची वाढवण्यासाठी योगा हा एक उत्तम उपाय आहे. हालचाल, लवचिकता आणि शरीराची ठेवण सुधारण्यास मदत करते. काही आसणे इतरांपेक्षा अधिक उपयुक्त असतात कारण ते मणक्यांना ताणण्यास आणि लांब करण्यास मदत करतात. कोब्रा पोझ, माउंटन पोझ, त्रिकोण पोझ,चाईल्ड पोझ आणि योद्धा पोझ यांसारखी पोझ उंची वाढवण्यास मदत करतात. त्यांचा नियमित सराव केल्याने तुमची एकूण शरीराची ठेवण आणि तुमचा फिटनेस देखील सुधारेल.

पुरेशी झोप

दररोज किमान नऊ ते दहा तास झोप घेतल्याने पौगंडावस्थेतील मुलांच्या शरीराचे योग्य कार्य आणि सर्व हार्मोन्स योग्य पध्दतीने वाढ होणे होते, विशेषत: HGH आपण झोपतो त्या वेळी शरीरामध्ये सोडले जाते. व्यवस्थि झोप न झाल्यामुळे शरीराची वाढ मंदावते किंवा खुंटते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com