
Irregular Sleep Effects
Esakal
थोडक्यात:
फक्त ८ तास झोप घेणं पुरेसं नाही; झोपेची नियमित वेळसुद्धा आरोग्यासाठी तितकीच महत्त्वाची आहे.
अनियमित झोपेमुळे सर्केडियन रिदम बिघडतो आणि त्याचा शरीरावर, मानसिक स्थितीवर व हार्मोन्सवर वाईट परिणाम होतो.
योग्य वेळी आणि सातत्यपूर्ण झोप घेतल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि एकूण आरोग्य सुधारते.
Irregular Sleep Schedules and Circadian Rhythm On Health: आपण अनेकदा ऐकतो की चांगल्या आरोग्यसाठी पुरेशी झोप आवश्यक आहे. बहुतांश तज्ज्ञ सुचवतात की प्रौढ व्यक्तींनी रोज किमान ६ ते ७ तासाची झोप घ्यावी. मात्र केवळ झोपेचे तास भरून निघाले की काम संपलं, असं समजणं चुकीचं ठरू शकतं.