World's Arthritis Day 2022 : संधिवातामुळे खराब झालेल्या गुडघ्यांची ट्रान्सप्लांट सर्जरी रोबोटिक्समुळे सोप्पी

रोबोटिक्समुळे रुग्णाच्या गुडघ्यातील वेदना आणि वक्रता नाहीशी होते
World's Arthritis Day 2022
World's Arthritis Day 2022esakal
Updated on

डॉ. शेखर श्रीवास्तव, ऑर्थोपेडिक्स विभागाचे प्रमुख, परमानंद विशेष शस्त्रक्रिया रुग्णालय, नवी दिल्ली म्हणाले की रोबोटिक तंत्रज्ञानाने गुडघा इम्प्लांट सर्जरीमध्ये आता अधिक अचूकता आली आहे.आपल्या देशात गुडघेदुखी आणि सांधेदुखी ही एक अतिशय सामान्य पण तितकीच गंभीर समस्या आहे. याचे मुख्य कारण म्हणजे ऑस्टियोआर्थरायटिस, ज्यामध्ये गुडघ्यांच्या कार्टिलेजची म्हातारपणामुळे हळू हळू झीज व्हायला लागते, त्यामुळे गुडघे दुखतात आणि गुडघ्याची वाटीही अनेकदा सरकू शकते.

World's Arthritis Day 2022
Health Tips: पायात सारखे गोळे येताय? सावधान, 'ही' असू शकतात कारणं

अशा रुग्णांमध्ये गुडघ्यांचे ट्रान्सप्लांट सर्जरी आश्चर्य जनक परिणाम दाखवते. यामुळे रुग्णाच्या गुडघ्यातील वेदना आणि वक्रता नाहीशी होते आणि रुग्ण कोणत्याही त्रासाशिवय आपली कामं नीट करू शकतो. या गुणांमुळे आज लाखो रुग्ण गुडघ्यांची ट्रान्सप्लांट सर्जरी करून सुखी आयुष्य जगता आहेत. आता रोबोटिक तंत्रज्ञानाने गुडघ्याची ट्रान्सप्लांट सर्जरी अजून अचूक झाली आहे.

World's Arthritis Day 2022
World Arthritis Day : सारखा मोबाईल पाहताय, वेळीच आवरा, होईल संधिवात

लवकर आराम मिळतो

रोबोटिक पद्धतीने केलेल्या गुडघ्यांच्या ट्रान्सप्लांट सर्जरीमध्ये अचूकतेमुळे रुग्णाला पारंपरिक सर्जरीपेक्षा जास्त फायदा होताना दिसतो आहे. या सर्जरीनंतर गुडघ्याची नैसर्गिकता बर्‍याच प्रमाणात परत येते.

World's Arthritis Day 2022
World Arthritis Day: चार जणांमागे एकाला संधीवाताचा त्रास

स्क्रीनवर बघून सर्जरी

फुल्ली अॅक्टिव्ह रोबोटिक क्युविस, हे जगातील अत्याधुनिक रोबोटिक तंत्रज्ञानापैकी एक आहेत याचा वापर करून त्या रुग्णाच्या गुडघ्याच 3D स्ट्रक्चर सर्जनला एका स्क्रीन वर दिसतं यामुळे सर्जरी करत असताना सांध्याच्या प्रत्येका बाजूचे चित्र सर्जन बघू शकतो. आणि मग रोबोट च्या माध्यमाने सर्जनच्या देखरेखीखाली ही सर्जरी केली जाते. असे असल्यामुळे पारंपरिक सर्जरीत असणारा धोका बराचशा प्रमाणात कमी झाला आहे.

World's Arthritis Day 2022
World Tourism Day 2022 : बीच शॅक्स परवानगीच्या प्रतीक्षेत

अनावश्यक नुकसानापासून रक्षण करते

हे तंत्र गुडघ्याच्या पारंपरिक सर्जरीपेक्षा रुग्णाला अधिक गतिशीलता प्रदान करते आणि सर्जरीनंतर गुडघा तुलनेने जास्त नैसर्गिकरित्या काम करतो. सर्जन फक्त खराब झालेल्या भागावरच काम करतात, त्यामुळे हाडे आणि स्नायूंना कमी नुकसान होते आणि रक्तही कमी प्रमाणात वाहते. रोबोटिक सर्जरी मधल्या अचूकतेमुळे, रूग्ण अधिक लवकर बरा होतो आणि तुलनेने त्याला लवकर डिस्चार्ज देखील मिळतो. रोबोटिक गुडघा इम्प्लांट शस्त्रक्रिया हे आधुनिक तंत्रज्ञान आणि सर्जन कौशल्याच्या संमिश्रणाचे उत्कृष्ट उदाहरण आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com