World Blood Cancer Day: रक्त कर्करोग नेमका कशामुळे होतो? जाणून घ्या कारणे, लक्षणे आणि उपचार एकाच क्लिकवर

World Blood Cancer Day Awareness and Importance: रक्त कर्करोग हा सर्वात सामान्य कर्करोगांपैकी एक असून तो रक्तातील पेशींवर परिणाम करतो. हा आजार मुख्यतः DNA मधील नैसर्गिक बदलांमुळे होतो आणि अनुवंशिक नसतो.
World Blood Cancer Day
Blood Cancer Causes, Symptoms and Treatmentsakal
Updated on

Most Common Symptoms of Leukemia and Lymphoma: कर्करोगच्या अनेक प्रकारांपैकी एक आणि प्रामुख्याने होणारा कर्करोग म्हणजे रक्त कर्करोग. बहुतांश कर्करोगच्या एकूण निदानांमध्ये हा मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरतो. रक्त कर्करोग हा सर्वात सामान्य कर्करोगांपैकी एक असून तो रक्तातील पेशींवर परिणाम करतो. हा आजार मुख्यतः DNA मधील नैसर्गिक बदलांमुळे होतो आणि अनुवंशिक नसतो. ल्यूकेमिया, लिम्फोमा, मायलोमा हे त्याचे प्रमुख प्रकार असून MPNs आणि MDS हे अन्य प्रकार आहेत. काही वेळा हा आजार लहान मुलांनाही होतो, मात्र मुले आणि मोठ्यांमध्ये लक्षणे व उपचार वेगळे असतात.

दरवर्षी २८ मे रोजी ‘जागतिक रक्त कर्करोग दिन’ साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश लोकांमध्ये रक्त कर्करोग आणि त्याच्या प्रतिबंधाबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि वेळीच निदान व उपचाराचे महत्त्व पटवून देणे हा आहे.

या निमित्ताने रक्त कर्करोगची कारणे, लक्षणे आणि उपचार पद्धती याविषयी थोडक्यात माहिती घेऊया.

World Blood Cancer Day
Alcohol and Cancer Risk: दारूमुळे 20 प्रकारच्या कर्करोगाचा धोका? काय सांगतात आरोग्यतज्ज्ञ? वाचा सविस्तर

रक्त कर्करोगाची कारणे

DNA मध्ये बदल (म्युटेशन):

रक्त कर्करोग अनेक वेळा रक्ताच्या पेशींच्या DNA मध्ये होणाऱ्या बदलांमुळे होतो. हे बदल नेमके का होतात, हे अजून पूर्णपणे समजलेलं नाही.

काही जोखीम वाढवणारे घटक (Risk Factors):

– वय जास्त असणे

– पुरुषांमध्ये जास्त प्रमाण

– धुम्रपान करणे

– हानिकारक रसायनांशी संपर्क (जसे की केमिकल्स)

– पूर्वीचा कर्करोग उपचार

– कुटुंबात आधी कोणाला कर्करोग झालेला असणे

काही विषाणूंचा संसर्ग:

एप्स्टीन-बार (Epstein-Barr) सारख्या काही विषाणूंचा संबंध लिम्फोमा या प्रकारच्या रक्त कर्करोगाशी जोडला गेलाय.

रोगप्रतिकारक शक्ती कमजोर असणं:

HIV/AIDS सारखे आजार किंवा शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम करणारे विकार असतील, तर रक्त कर्करोगाची शक्यता जास्त असते.

रक्त कर्करोगाची लक्षणे

थकवा आणि अशक्तपणा:

शरीरात रेड ब्लड सेल्स (लाल पेशी) कमी झाल्यामुळे शरीराला पुरेसं ऑक्सिजन मिळत नाही, त्यामुळे सतत थकवा येतो आणि शक्ती कमी वाटते.

वारंवार इंफेक्शन होणं:

शरीरात पांढऱ्या पेशी कमी झाल्या की रोगप्रतिकारक शक्ती कमी होते, त्यामुळे लवकर सर्दी, खोकला, ताप किंवा इतर आजार होऊ शकतात.

World Blood Cancer Day
World Cancer Day 2025: 'जागतिक कर्करोग दिना'निमित्त जाणून घ्या कर्करोगाची ही लक्षणे, चुकूनही करू नका दुर्लक्ष

सहज खरचटणं किंवा रक्तस्राव होणं:

प्लेटलेट्स कमी झाल्यास अंगावर लगेच निळसर डाग पडतात, जखम झाली की रक्त थांबत नाही किंवा नाकातून सहज रक्त येऊ शकतं.

अचानक वजन कमी होणं:

डाएट किंवा व्यायाम न बदलता वजन कमी होणं हे एक गंभीर लक्षण असू शकतं. हे शरीरातील कर्करोग पेशीमुळे होऊ शकतं.

रात्री भरपूर घाम येणं:

रात्री झोपेत खूप घाम येणं, अगदी अंथरुण ओलं होईपर्यंत, हे लक्षण असू शकतं.

गाठ दिसणं (लसिका ग्रंथी सुजणं):

मानेला, काखेत किंवा जांगेच्या भागात गाठी जाणवणं हे लिम्फोमा या रक्त कर्करोगाच्या प्रकाराचं लक्षण असू शकतं.

यकृत किंवा प्लीहा (स्प्लीन) सुजणं:

काही वेळा कर्करोग पेशी यकृत किंवा प्लीहामध्ये साचून सूज येते आणि पोटात जडपणा किंवा दुखू लागतो.

हाडांना दुखणं:

मायलोमा सारख्या कर्करोगात हाडं कमकुवत होतात आणि सतत दुखत राहतात.

धाप लागणं:

रेड ब्लड सेल्स कमी झाल्यास शरीराला ऑक्सिजन कमी मिळतो, त्यामुळे चालताना किंवा कधी कधी बसल्या अवस्थेतही धाप लागते.

ताप किंवा अंग थरथर कापणं:

शरीराचं संरक्षण कमी झाल्यामुळे वारंवार ताप येतो किंवा अचानक अंग थरथर कापू लागतं.

World Blood Cancer Day
Head And Neck Cancer Symptoms: तुम्हाला अचानक मानेत गाठ जाणवत आहे? दुर्लक्ष करू नका! असू शकते 'या' गंभीर आजाराचे लक्षण

रक्त कर्करोगसाठी प्रभावा उपचारपद्धती

केमोथेरपी:

कर्करोग पेशी मारण्यासाठी औषधं दिली जातात. गोळ्या, इंजेक्शन किंवा ड्रिपच्या रूपात ही औषधं दिली जातात.

किरण चिकित्सा:

कर्करोग असलेल्या भागावर विशेष किरणं टाकून त्या पेशी नष्ट केल्या जातात.

स्टेम सेल ट्रान्सप्लांट:

खराब झालेल्या हाडमज्जेऐवजी नव्या आणि निरोगी स्टेम सेल्स घालून शरीराला बळ दिलं जातं.

इम्युनोथेरपी:

शरीराची प्रतिकारशक्ती वाढवून कर्करोग पेशींशी लढण्यासाठी औषधं वापरली जातात.

टार्गेटेड थेरपी:

फक्त कर्करोग पेशींवर परिणाम करणारी औषधं वापरली जातात, त्यामुळे इतर पेशींना त्रास होत नाही.

World Blood Cancer Day
Foods to Cut Prostate Risk: प्रोस्टेट कर्करोगाचा धोका टाळण्यासाठी पुरुषांनी 'हे' 6 सुपरफूड्स न चुकता खाल्ले पाहिजेत

शस्त्रक्रिया:

काही गाठी किंवा ग्रंथी काढण्यासाठी ऑपरेशन केलं जातं.

सक्रिय निरीक्षण:

हळूहळू वाढणाऱ्या लिम्फोमासाठी लगेच उपचार न करता डॉक्टर रुग्णाची प्रकृती नियमित तपासत राहतात.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com