

Mars planet entering Capricorn zodiac sign in January 2026, forming powerful Ruchaka Rajyoga
esakal
Astrology prediction news : नवीन वर्ष २०२६ ची सुरुवात एका शुभ योगाने होत आहे. मंगळ ग्रह १६ जानेवारी रोजी पहाटे सुमारे ४ वाजता धनु राशीतून बाहेर पडून आपल्या उच्च राशी मकरमध्ये प्रवेश करेल. हा गोचर २३ फेब्रुवारीपर्यंत राहील आणि यामुळे पंचमहापुरुष योगांपैकी एक शक्तिशाली रुचक राजयोग निर्माण होईल. ज्योतिषशास्त्रात रुचक योग हा धैर्य, नेतृत्व, संपत्ती आणि राजेशाही सुख देणारा मानला जातो. मकर संक्रांतीनंतर हा योग विशेष फलदायी ठरेल, कारण मंगळाची ऊर्जा वाढून अनेकांना करिअर, आर्थिक आणि वैयक्तिक जीवनात मोठी प्रगती मिळेल. हवामानातही बदल होऊन थंडी कमी होईल. चला जाणून घेऊया या राशींना काय लाभ होतील.