
या सप्ताहात तुम्हाला माणसांची चांगली पारख होईल. स्वप्न व सत्य यातील फरकही लक्षात येईल. मनातील बेत प्रत्यक्षात साकार करण्यासाठी व्यवसायातील कामात बदल करावा लागेल. हाती असलेल्या कामांना गती मिळेल. पैशाची तजवीज करून ठेवावी लागेल. नोकरीत बदलीसाठी प्रयत्न करण्यास हरकत नाही.
महत्त्वाचे ग्रह अनुकूल आहेत, त्यामुळे फायदा घ्या. व्यवसायातील कामांना प्राधान्य देऊन त्याप्रमाणे वेळेचे नियोजन करा. पूर्वी केलेल्या कामाचे पैसे हाती येतील, त्यातून नवीन गुंतवणुकीचे विचार मनात येतील. नोकरीत वरिष्ठ आवळा देऊन कोहळा काढीत नाहीत ना, याची काळजी घ्या. कोणावरही अतिविसंबून राहू नका.