Jalgaon News : पातोंडा-अमळगाव कालव्यात 10 Recharge Shafts पूर्ण

Officials and villagers at the inauguration of the canal's recharge shaft work.
Officials and villagers at the inauguration of the canal's recharge shaft work. esakal

Jalgaon News : युनियन बँक ऑफ इंडिया व पातोंडा परिसर विकास मंच यांच्या सौजनाने पातोंडा, अंमळगाव (डी १) कालव्यात दहा रिचार्ज शाफ्ट करण्यात आले. (10 Recharge Shafts completed in Patonda amalgaon Canal jalgaon news)

युनियन बँक ऑफ इंडियाचे अमळनेर शाखेचे प्रतिनिधी उदय पाटील, शहादा शाखा व्यवस्थापक मयूर पाटील, नागपूर मविप्रा उपसंचालक कपिल पवार, फाॅरेन्सिक अधिकारी राहुल बिरारी, पातोंडा सरपंच भरत बिरारी, रूंधाटी सरपंच धनराज पवार, नांद्री माजी सरपंच मधुकर चौधरी यांच्या उपस्थितीत रिचार्ज शाफ्टचे भूमिपूजन करून तीन दिवसांत प्रत्येकी १३० ते १५० फूट खोलीचे दहा रिचार्ज शाफ्ट करण्यात आले.

पातोंडा, रूंधाटी, मठगव्हाण व जळोद शिवारातून गिरणा पाटबंधारे अंतर्गत पातोंडा- अंमळगाव डी १ कालवा जातो. या परिसरात भूजल पातळीत मोठी घसरण झाली असून, तीनशे ते चारशे फूट कूपनलिका करून देखील पाणी लागत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना पावसाच्या पाण्यावर कोरडवाहू शेती करावी लागते.

तसेच पावसाळ्यात देखील मजुरांना पिण्याचे पाणी घरून घेऊन जावे लागते. या परिसरातील पाण्याचे दुर्भिक्ष्य दूर व्हावे व भूजल पातळीत वाढ व्हावी, यासाठी पातोंडा परिसर विकास मंचने युनियन बँक ऑफ इंडियाकडे रिचार्ज शाफ्टसाठी सीएसआर मधून निधी मागणी केली असता विकास मंचचे कृषी क्षेत्रातील भरीव कार्य लक्षात घेऊन युनियन बँकांच्या सौजन्याने दहा रिचार्ज शाफ्टचा निधी मंजूर केला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Officials and villagers at the inauguration of the canal's recharge shaft work.
Jalgaon News : एकता महिला मंडळाची दुःखावर फुंकर! निधन झालेल्या समाजबांधवांच्या घरी पोचवणार शिदोरी

भूमिपूजन व लोकार्पणप्रसंगी उपसरपंच नितीन पारधी, ग्रामपंचायत सदस्य दिलीप बोरसे, सोपान लोहार, वैद्यकीय अधिकारी विशाल पवार, विकासो संचालक किशोर मोरे, विकास मंच सदस्य विलास चव्हाण, प्रवीण बिरारी, राजन बिरारी, संदीप बिरारी, प्रा. भूषण बिरारी, घनश्याम पाटील, राकेश पाटील, चंद्रशेखर पवार, महेंद्र पाटील, नवल मोरे, केदार पवार (मठगव्हाण), रूंधाटी येथील भय्या पवार, अनिल पवार, दापोरी येथील ग्रामस्थ दिलीप पाटील, विजय पाटील, सोनखेडे संदीप बोरसे, दीपक बोरसे आदी उपस्थिकत होते.

"या आधी जैन उद्योग समूहाने केलेला रिचार्ज शाफ्ट प्रकल्प यशस्वी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या विकासासाठी युनियन बँकतर्फे रिचार्ज शाफ्टसाठी निधी उपलब्ध करून दहा रिचार्ज शाफ्ट पूर्ण केले."- उदय पाटील, प्रतिनिधी युनियन बँक, अमळनेर

Officials and villagers at the inauguration of the canal's recharge shaft work.
Jalgaon News : महामार्ग शेजारी वृक्षारोपण केवळ नावालाच? सावलीसाठी झाडच नाही

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com