Jalgaon News : Pink Autoघेणाऱ्यांना 10 हजारांची मदत : आमदार सुरेश भोळे

Jalgaon: Women and their families who were given rickshaws at the Pink Auto Rickshaw distribution ceremony held by Marathi Foundation on Thursday.
Jalgaon: Women and their families who were given rickshaws at the Pink Auto Rickshaw distribution ceremony held by Marathi Foundation on Thursday.esakal

Jalgaon News : शहरातील महिला रिक्षा चालविण्याचा व्यवसाय अतिशय उत्तम करीत असून, शहराच्या नावलौकिकास भर पडत आहे. त्यामुळे पिंक ऑटो घेणाऱ्या महिलांना प्रत्येकी दहा हजार रुपयांची आर्थिक मदत करणार, अशी ग्वाही आमदार सुरेश भोळे यांनी दिली.

मराठी प्रतिष्ठानतर्फे गुरुवारी (ता. २२) पाच पिंक रिक्षाचे वितरण आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते.

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही, मोटर वाहन निरीक्षक हेमंत सोनवणे, उद्योजक सुबोध चौधरी, पंजाब नॅशनल बँकेचे शाखाधिकारी सुयोग देसले, टॅक्सी युनियनचे रज्जाक गणी खान, वीर सावरकर रिक्षा युनियनचे दिलीप सपकाळे उपस्थित होते.(10,000 help for pink auto buyers MLA Suresh Bhole Distribution of auto to women Jalgaon News)

महिलांसाठी स्वतंत्र रिक्षा थांबा देण्याबाबत महापालिका व परिवहन अधिकारी या सर्वांसोबत चर्चा करून लवकरच मार्ग काढू, असेही आमदार भोळे यांनी सांगितले.

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्‍याम लोही यांनी मार्गदर्शन केले. टॅक्सी युनियनचे रज्जाक गणी खान व रिक्षा युनियनचे दिलीप सपकाळे यांनी मनोगत व्यक्त केले.

पिंक ऑटो महिलांचे लायसन्सचे काम करणारे किरण अडकमोल व महिलांना ट्रेनिंग देणारे नूर शेख यांचा सत्कार करण्यात आला. महिला पिंक ऑटोचालक संगीता बारी व पूनम गजरे यांनी आपले अनुभव कथन केले.

यांना दिल्या रिक्षा

पूनम वानखेडे, विजेता सोनवणे, सुनीता सपकाळे, जयश्री पाटील, धनमाला सुरडकर यांना रिक्षा वितरण करण्यात आले. मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष जमील देशपांडे, विश्वस्त निलोफर देशपांडे, डॉ. सविता नंदनवार, तांबापूर फाउंडेशनचे अध्यक्ष मतीन पटेल, पिंप्राळा प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप पाटील उपस्थित होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Jalgaon: Women and their families who were given rickshaws at the Pink Auto Rickshaw distribution ceremony held by Marathi Foundation on Thursday.
Jalgaon News : ‘शासन आपल्या दारी’ त लाभार्थ्यांना त्रास नको : गुलाबराव पाटील

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com