Jalgaon News : लाखावर नागरिकांची एचआयव्ही चाचणी; 6 महिन्यांत 133 जण आढळले बाधीत

Nagpur investigation committee for HIV infection through blood donation
Nagpur investigation committee for HIV infection through blood donationSakal

Jalgaon News : जिल्ह्यात एडस्‌ बाधीतांचे प्रमाण केवळ ०.१ टक्क्यांवर आले आहे. यंदा जिल्ह्यात एचआयव्ही चाचणी करण्याचे उद्दिष्ट १ लाख ६० हजार २०४ एवढे होते. त्यात सहा महिन्यांतच १ लाख ५४४ नागरिकांची एचआयव्ही चाचणी करण्यात आली.

त्यातून ६२.८० टक्के उद्दीष्ट्य पूर्ण झाले आहे. दरम्यान, सहा महिन्यांत जिल्ह्यात १३३ जणांना एडस्‌ची बाधा झाल्याचे आढळून आले. हे प्रमाण केवळ ०.१ टक्के आहे. २००९-१० मध्ये हे प्रमाण दर महिन्याला ३०४ एवढे होते. अशी माहिती जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंध विभागाच्या बैठकीत देण्यात आली.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंध विभागाची सोमवारी (ता. ९) आढावा सभा झाली. त्यात ही माहिती समोर आली. (133 people were found hiv affected in 6 months jalgaon news)

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, डॉ. आकाश चौधरी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन बाहेकर, जिल्हा माहिती अधिकारी सुरेश पाटील, पोलिस अधीक्षक कार्यालयाचे प्रतिनिधी, तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड, जिल्हा एड्स नियंत्रण विभागातील कार्यक्रमाधिकारी संजय पहुरकर, जिल्हा एड्स नियंत्रण विभागातील गिरीश गडे, जिल्हा एड्स नियंत्रण विभागाअंतर्गत विविध गटांमध्ये कार्यरत असलेले सामाजिक संस्थांचे कर्मचारी या वेळी उपस्थित होते.

एड्स नियंत्रण विभागाच्या कार्यक्रमाचा व मागील सभेमध्ये झालेल्या विषयांवरील कार्यवाहीबाबत आढावा घेण्यात आला. तालुका स्तरावरील एचआयव्ही संसर्गितांची मॅपिंग करण्यात आली.

Nagpur investigation committee for HIV infection through blood donation
Jalgaon News : राष्ट्रीयीकृत बँकेत ग्राहकांची पैसे काढण्यासाठी तारांबळ; सुविधांच्या अभावामुळे खातेधारकांचे हाल

एचआयव्ही संसर्गित बालकांना प्रोटीन पावडर उपलब्धतेसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला. बैठकीदरम्यान एचआयव्ही- एड्स टोल फ्री क्रमांक ‘१०९७’, एचआयव्ही- एड्‌स प्रतिबंध व नियंत्रण कायदा २०१७, एचआयव्ही- एड्स क्यूआर कोडचे प्रकाशन करण्यात आले.

जिल्ह्यातील एचआयव्हीसह जगणाऱ्यांना व अतिजोखीम गटातील नागरिकांना रेशन कार्ड, धान्य पुरवठा, शासकीय योजना मिळण्याबाबत जिल्ह्यातील जास्तीत जास्त खासगी प्रयोगशाळा, रुग्णालयांनी जिल्हा एड्स नियंत्रण विभागास संबंधीत माहिती प्रत्येक महिन्याला सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी प्रसाद यांनी दिले. जिल्हा स्तरावर जिल्हा माहिती अधिकाऱ्यांमार्फत बल्क एसएमएस व पोस्टरच्या माध्यामातून जनजागृती करण्याबाबतही या वेळी सूचित करण्यात आले.

Nagpur investigation committee for HIV infection through blood donation
Jalgaon News : पावसाळा संपला, जनतेचा रोष वाढतोय, रस्त्याची कामे करा; मक्तेदारांना आदेश

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com