Jalgaon News : 22 वर्षीय शेतकऱ्याची विष घेऊन आत्महत्या

Death News
Death Newsesakal

Jalgaon News : गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने तालुक्यात दडी मारल्यामुळे पाण्याअभावी पिके सुकू लागली आहेत. (22 year old farmer commits suicide jalgaon news)

परिणामी, नैराश्‍याने ग्रासलेल्या पिंपळकोठा येथील २२ वर्षीय शेतकऱ्याने फवारणीसाठी आणलेले औषध घेऊन आत्महत्या केली.

पारोळा पोलिसांत अरुण शंकर राठोड यांनी माहिती दिली, की त्यांचा लहान भाऊ मोहन राठोड (वय २२, रा. पिंपळकोठा, ता. पारोळा) हा शुक्रवारी (ता. १) फवारणीसाठी गेला असता, पिकांची स्थिती पाहून त्याने फोनवर सांगितले, की शेतातील पिके करपली आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Death News
Nashik Crime News : शिवीगाळ करण्याच्या शुल्लक कारणावरून सख्या भावाचा खून

त्यामुळे मी कपाशीवर फवारणीसाठी आणलेले विषारी औषध हे पिऊन घेतले आहे. तुम्ही शेतात या. हे ऐकून नातेवाइकांसह ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.

मोहन यास उपचारासाठी खासगी वाहनाने कुटीर रुग्णालय येथे दाखल केले असता, डॉक्टरांनी दुपारी दोनच्या सुमारास तपासून मृत घोषित केले. पारोळा पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Death News
Bhusawal Crime News: तिहेरी हत्याकांडाने भुसावळ हादरलं, एका रात्रीत सख्या भावांसह तिघांचा खून

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com