Jalgaon News : रेल्वेरूळ उतरवताना अपघात; गाळण रेल्वेस्थानकाजवळील घटना

Railway Track
Railway Trackesakal

पाचोरा (जि. जळगाव) : मध्य रेल्वेच्या पाचोरा ते गाळण रेल्वे मार्गावर गाळण स्थानक परिसरात रेल्वे (Railway) रॅकमधून रूळ उतरवताना वायर लूम (तारेचा दोर) तुटल्याने पाच रेल्वे ट्रॅकमन जखमी झाले. ही घटना शुक्रवारी (ता.३) सकाळी दहाच्या सुमारास घडली. (5 railway trackmen were injured whenwire loom broke while unloading rail track from rail rack in Galan station area jalgaon news)

जखमी रेल्वे कर्मचाऱ्यांवर पाचोरा येथील खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात आले आहे. पाचोरा ते गाळण दरम्यान रेल्वे रॅकमधून आणलेले रेल्वेरूळ उतरविण्याचे काम रेल्वे खांब कि.मी. क्रमांक ३६५/ २१- २३ जवळ शुक्रवारी सकाळी दहाचे सुमारास सुरू करण्यात आले.

वायर लूमला रेल्वेरूळ बांधून ते हळूहळू खाली उतरवत असतानाच वायर लूम तुटला. त्यामुळे हे काम करत असलेले सुरेश कुमार (वय २८, रा. पश्चिम बंगाल), राजकुमार (वय २४) व रवी कुमार (वय २४, रा. बिहार), चेतन पाटील (वय ३२) व रवींद्र पाटील (वय ५७) हे पाच कर्मचारी जखमी झाले. तेथे उपस्थित रेल्वे पर्यवेक्षकांनी रुग्णवाहिका पाचारण केल्यानंतर रुग्णवाहिका चालक भागवत पाटील हे लगबगीने घटनास्थळी पोहोचले व त्यांनी जखमींना पाचोरा येथे आणले.

हेही वाचा : बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...

Railway Track
Jalgaon Crime News : आईनेच केली मुलाची हत्या; संबंध लपविण्यासाठी मामी-भाच्याचे कृत्य

जखमींच्या हातावर रेल्वेरुळाचा भार आल्याने त्यांच्या हाताला दुखापत झाली आहे. या रुग्णांवर पाचोरा येथील खासगी रुग्णालयात उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात आले आहे. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाही. रेल्वे प्रशासनाच्यावतीने याची सखोल चौकशी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, या घटनेची माहिती कळताच माध्यमाच्या प्रतिनिधींनी घटना जाणून घेण्यासाठी रुग्णालयात धाव घेतली असता तेथे उपस्थित रेल्वे पर्यवेक्षकांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली. रेल्वे विभागीय कार्यालय वरिष्ठांना घटना कळवली असून, आपण तेथून माहिती घ्या, असे सांगितले.

Railway Track
Jalgaon News : कमी भाडे दिल्याने मुलासह तीन प्रवाशांना बसमधून उतरविले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com