कुत्रा वाचविण्याच्या नादात रिक्षा झाडावर आदळली; अपघात प्रवासी महिलेचा मृत्यू 

कुत्रा वाचविण्याच्या नादात रिक्षा झाडावर आदळली; अपघात प्रवासी महिलेचा मृत्यू 

निंभोरा ः विवरे खुर्द बसस्टँड जवळ धावत्या रिक्षा समोर कुत्रा आल्याने व रस्त्यावरील खड्डा चुकविण्याच्या नादात रिक्षा चालकाचे नियंत्रण सुटल्याने रिक्षा रस्त्याच्या बाजूला असलेल्या चिंचेच्या झाडाला आदळून अपघात झाला. या अपघातात विवरे खुर्द येथील महिलेचा मृत्यू झाला, तर दोन महिला जखमी झाल्या.

आवर्जून वाचा- जळगाव जिल्हात राष्ट्रवादीत चिंता वाढली; खडसे पाठोपाठ मलिक, देसले कोरोनाबाधित


रावेर येथील रिक्षा क्र एमएच 19 ए ई 6686  फैजपुर येथून रावेर कडे प्रवाशांना घेवून येत होती. विवरे खुर्द बस स्थानका जवळ रस्त्यावर खड्डा असल्याने तसेच समोर अचानक कुत्रा आल्याने  रिक्षाचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. आणि थेट रिक्षा समोरील चिंचेच्या झाडावर धडकली. या अपघातात विवरे बु॥च्या आझाद नगर मधील रहिवाशी सगीराबी शे शकूर ( वय 49 ) यांचा मृत्यू झाला . तर रिक्षात सोबत असलेल्या यासमीन बी शे फरिद व नजमाबी शे हाफीस खा गंभीर जखमी झाल्या असुन फैजपुर येथील खाजगी दवाखान्यात उपचार घेत आहे. याबाबत रिक्षाचालका विरुध्द निंभोरा पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला आहे .  

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com